लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एप्रिलच्या पहिल्याच दिवशी कडक ऊन व गर्मीने नागपूरकरांना घाम फोडला. रविवारी पारा ४१.४ अंशांवर स्थिरावला. रात्रीच्या तापमानातही २.५ अंशांनी वाढ होऊन २२.१ अंश तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस तापमानात घट होण्याची शक्यता नाही. असे असले तरी आकाशात ढगांची गर्दी राहील. ४ ते ५ एप्रिल दरम्यान वादळ वाऱ्यासह पावसाची चिन्हे आहेत.हवामान खात्यानुसार पश्चिम अरुणाचल प्रदेशापासून दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश पर्यंत पश्चिम भागात वातवरणात बदल झाला आहे. समुद्र तळापासून ७.६ किमी उंचीवर असल्यामुळे तात्काळ याचा परिणाम मध्य भारतात दिसणार नाही. दरम्यान, उत्तर पूर्व मध्य प्रदेशासह शेजारच्या परिसरात समुद्र सपाटीपासून १.५ किमी उंचीवरह चक्रवात तयार झाला आहे.यामुळे वादळीवाऱ्यासह पाऊस पडू शकतो. रविवारी सकाळी नागपुरात कडाक्याचे ऊन होते. तीव्रतेमुळे रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती. लोक ऊन्हापासून बचावासाठी आडोसा घेताना दिसले.विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातही पारा वर सरकत आहे. ४२ अंशांसह चंद्रपूर सर्वाधिक उष्ण राहिले. अकोल्यात सर्वाधिक तापमान ४१.७, वर्धा ४१.५, यवतमाळ ४१, ब्रह्मपुरी ४०.८, गोंदिया ४०.४, अमरावती ४०.४, गडचिरोली ३९ व बुलडाणा येथे ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपुरात रात्रीचे तापमान सर्वाधिक २८ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.
विदर्भात ढगांच्या गर्दीत पारा चढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:16 AM
एप्रिलच्या पहिल्याच दिवशी कडक ऊन व गर्मीने नागपूरकरांना घाम फोडला. रविवारी पारा ४१.४ अंशांवर स्थिरावला. रात्रीच्या तापमानातही २.५ अंशांनी वाढ होऊन २२.१ अंश तापमानाची नोंद झाली.
ठळक मुद्देदिवसभर कडाडले ऊनवादळवाऱ्यासह पावसाची शक्यता