ठळक मुद्देकीटकनाशक फवारणीबाबत शेतकºयांत भयशासकीय खरेदी केंद्रांची सुस्त तर व्यापारी मस्तशेतकºयांना पुन्हा गळफासाकडे नेणारी परिस्थिती
आॅनलाईन लोकमतनागपूर: गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या भागातील शेतकºयांसमोरची परिस्थिती बिकट झाली आहे.सोयाबीनचे पीक शेतकºयांच्या सध्या हातात आहे. मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकºयाला पडता भाव स्वीकारावा लागतो आहे. खरेदी केंद्रांवर नेलेले शेकडो क्विंटल सोयाबीन परत आणावे लागते आहे. शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये एवढा हमीभाव दिला असला तरी, शासन खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. व्यापारी त्याला अडवून धरत पडेल किंमतीत माल विकत घेत आहेत.शासकीय केंद्रांवर खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणीकरिता लागणारी कागदपत्रे जमवता जमवता शेतकºयांची पुरेवाट होते. नोंदणी झाल्यावर संथ गतीने शेतमाल खरेदी केला जातो आणि त्याचे चुकारे पुन्हा त्याच संथ गतीने दिले जातात. या सगळ््या काळात शेतकºयांनी आपला आर्थिक व्यवहार कसा चालवायचा हा एक मोठा प्रश्नच असतो.जी गोष्ट सोयाबीनची तीच कापसाचीही आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे उत्पादन घटले तर परतीच्या पावसानेही सोयाबीनचे नुकसान झाले आहे. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेमुळे शेतकºयांमध्ये या वर्षी फवारणीबाबत भय निर्माण झाले आहे. कित्येक ठिकाणी हेल्मेट घालून फवारणी करताना शेतकरी दिसत आहेत.यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केलेले आहे. ढगाळ वातावरण व लगेचच उन पडणे या प्रतिकूल वातावरणाचा फटका पीकाला बसतो आहे.विदर्भात धानाच्या पिकावर तुडतुडा या रोगाने प्रचंड आक्रमण केल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील उभे पीक फस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील धानपीकाला तुडतुडा रोगाची लागण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या लहरीपणामूळे धान पिकावर मावा, तुडतुडा, करपा, घाटे अळी, लाल्या, बेरड रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झाला असून धान पिके धोक्यात आली आहेत.