शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विधान भवनावर धडकणार विदर्भ दिंडी यात्रा

By admin | Published: October 29, 2016 2:21 AM

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समिती : ५ डिसेंबरला मोर्चानागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे. विदर्भाच्या पाच सीमांवरून ही विदर्भ दिंडी निघेल आणि ती ५ डिसेंबर रोजी नागपुरात विधान भवनावर धडकेल. ५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मोर्चा काढून विदर्भ राज्य ‘देता की जाता’ असा जाब सरकारला विचारला जाईल. या मोर्चासाठी विदर्भाच्या पाच सीमांवरून विदर्भ दिंडी यात्रा काढण्यात येत आहे. पहिली दिंडी ही सिंदखेडराजा (बुलडाणा) येथून १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता निघेल. देऊळगाव, चिखली, मेहकर, रिसोड, वाशिम, पातूर, बार्शी टाकळी, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, तिवसा, तळेगाव, कारंजा घाडगे, कोंढाळी, हिंगणा मार्गे नागपूरला पोहोचेल.दुसरी दिंडी शेंडगाव (दर्यापूर) येथून ३० नोव्हेंबरला निघेल. दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबजार, मोर्शी, वरुड, जलालखेडा, मोवाड, नरखेड, सावरगाव, काटोल, कळमेश्वर, सावनेर, खापा, पाटणसावंगीमार्गे पोहोचेल. तिसरी दिंडी उमरखेड येथून १ डिसेंबरला निघेल. महागाव, पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर, यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, वडकी, वडनेर, हिंगणघाट, समुद्रपूर, सेवाग्राम, वर्धा, पवनार, सेलू, सिंदी (रेल्वे), बुटीबोरी मार्गे पोहोचेल. चौथी दिंडी कालेश्वर (गडचिरोली) येथून १ डिसेंबरला निघेल. सिरोंचा, अहेरी, गडचिरोली, आरमोरी, वडसा, ब्रह्मपुरी, नेरी, भिवापूर, उमरेड, कुही मार्गे पोहचेल.पाचवी दिंडी देवरी (गोंदिया) येथून १ डिसेंबरला निघेल. गोरेगाव, गोंदिया, तिरोडा, तुमसर, मोहाडी, भंडारा, जवाहरनगर, मौदा, चाचेर, रामटेक, कन्हान, कामठी मार्गे पोहचेल. यासंदर्भातील तयारी व यात्रादरम्यान करण्यात येणाऱ्या जनजागृतीसंदर्भात समितीच्या मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चाच्या बॅनरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खंदेवाले, अ‍ॅड. नंदा पराते, अरुण केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, पुरुषोत्तम पाटील, अ‍ॅड. आनंदराव वंजारी, अ‍ॅड. टी.बी. कटरे, अ‍ॅड. अर्चना नंदघले, दिलीप नरवडीया, मधुभाऊ कुकडे, दिलीप बन्सोड, रामरतन राऊत, सरोज काशीकर, रफिक रंगरेज, मिलिंद पाटील, राजेंद्रसिंग ठाकूर, शालिक पाटील नाकाडे, अरुण मुनघाटे, डॉ. दीपक मुंडे, तुषार हट्टेवार, किशेर पातणवार, प्रभाकर दिवे, शैला देशपांडे अ‍ॅड. सुरेश वानखेडे, अ‍ॅड. विजय राऊत, धर्मराज रेवतकर, अनिल तिडके, विष्णूपंत वानखेडे, भीमराव फुसे, श्याम वाघ प्रामुख्याने उपस्थित होेते. (प्रतिनिधी)