लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. बुधवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना करण्यात आली. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ८.४० ऐवजी रात्री १०.३० वाजता सोडण्यात आली तर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा मेल, शालिमार एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.पावसामुळे मुंबई मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. याचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदिया ऐवजी नागपूरवरून रवाना केली. रेल्वेगाडी क्रमांक १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रात्री ८,४० ऐवजी १०.३० वाजता रवाना करण्यात आली तर १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रद्द, १२८०९ छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा मेल, १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस आणि १२२६२ हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२८१० हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई मेल ३.३० तास, १६३६० पाटणा-एर्नाकुलम एक्स्प्रेस १.३० तास, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस २ तास, शामता वैष्णोदेवी कटरा-यशवंतपूर स्पेशल ६.३० तास, १२९०६ कोलकाता-पोरबंदर ओखा एक्स्प्रेस १.१५ तास, १२१४६ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्स्प्रेस १.३० तास, १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस १.४५ तास, १२८६० हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई गीतांजली एक्स्प्रेस २ तास, १८०३० शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास आणि १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस १.२० तास उशिराने धावत आहे. रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला असून प्रवाशांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहण्याची पाळी आली.
विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 9:13 PM
पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. बुधवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना करण्यात आली. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ८.४० ऐवजी रात्री १०.३० वाजता सोडण्यात आली तर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा मेल, शालिमार एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देचार गाड्या रद्द : पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत