शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विदर्भ निर्माण महामंच लढणार सर्व जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:07 AM

स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देनागपुरातून माने, चंद्रपूरमधून मडावी, रामटेकमधून तिरपुडे, यवतमाळमधून अणे यांच्या नावांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार आहेत.विदर्भ निर्माण महामंचामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), विदर्भ माझा, शेतकरी संघटना, लोकजागर पार्टी, जनसुराज्य पार्टी, लोक जागर पार्टी, रिपाइं (खोरिप) आणि प्रॉवटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीसह विविध विदर्भवादी संघटना मागील काही वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत. परंतु काँग्रेस आणि भाजप दोघेही स्वतंत्र विदर्भ राज्य देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आता विदर्भवादी संघटनांनी स्वत:च निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र विदर्भ निर्माण व्हावे, या एकमेव मागणीसाठी आणि उद्दिष्टांसह हा महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. उमेदवारांबाबत चर्चा सुरू असून उमेवारांची यादी अंतिम टप्प्यात आहे. या महामंचमध्ये सहभागी असलेल्या आम आदमी पार्टीने मागची लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यावेळी आपच्या दोन्ही उमेदवारांनी चांगली मते घेतली होती. नागपुरातून अंजली दमानिया यांनी तब्बल ६९,०८१ मते घेतली होती. त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. तर रामटेकमधून लढलेले प्रताप गोस्वामी यांनी २५,८८९ मते घेतली होती. यंदा आम आदमी पार्टी महामंचमध्ये असल्याने त्याचा फायदा महामंच व आपला किती होतो हे येणारा काळ सांगले.या नावांवर चर्चासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत नागपुरातून बीआरएसपीने दावा केला आहे. त्यांच्यातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने हे नागपुरातून लढणार आहेत. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. त्याचप्रकारे चंद्रपूर येथून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. वामनराव चटप आणि बीआरएसपीचे अ‍ॅड. दशरथ मडावी, रामटेक येथून विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, यवतमाळ येथील विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड. श्रीहरी अणे, आपतर्फे वसंतराव ढोके, भंडारा येथून देवीदास लांजेवार, झेड.एम. दूधकोअर गुरुजी, वर्धा येथून लोक जागर पार्टीचे कवी ज्ञानेश वाकुडकर, बुलडाणा येथून अभयसिंग पाटील आणि मेजर अशोक राऊत आदी नावांची चर्चा सुरू आहे.उमेदवारांची आज घोषणास्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रश्नावर काँग्रेससह भाजपनेही फसवणूक केली आहे. त्यामुळे आता विदर्भ निर्माण महामंच स्वत: निवडणुकीला सामोरा जाणार आहे. विदर्भ निर्माण महामंच हा तिसरा पर्याय म्हणून सक्षमपणे उभा राहील. विदर्भातील सर्व दहा जागा लढवण्यात येतील. आमचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. उमेदवारांची घोषणा शुक्रवारी केली जाईल.राम नेवलेविदर्भ निर्माण महामंच, समन्वयक

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVidarbhaविदर्भ