लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात रुग्णसंख्या मंदावल्याचे मंगळवारच्या रुग्णसंख्येतून पुढे आले. आज ४४ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या ३८४३वर पोहचली आहे. मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. तीन जिल्ह्यात चार रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १३४ झाली आहे.विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यापासून रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत असलेल्या अकोला जिल्ह्यात आज केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला.विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात सर्वाधिक रुग्णाची नोंद झाली. १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १३२६ वर गेली आहे. मृतांची संख्या २१ असून डिस्चार्ज रुग्णांची संख्या ९४७ झाली आहे.अकोला जिल्ह्यात आज एक रुग्ण पॉझिटिव्ह तर एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२४४ तर मृतांची संख्या ६७ वर पोहचली आहे. सध्या ३५१ रुग्ण उपचार घेत आहेत.यवतमाळ जिल्ह्यात १५ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या २५३ झाली आहे. जिल्ह्यात नऊ मृत्यू व १६२ रुग्ण बरे झाले आहेत. ८२ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. वाशिम जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८३, बरे झालेल्यांची संख्या ४८ तर दोन मृत्यू आहे.वर्धा जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली. रुग्णसंख्या ३० झाली असून यातील २१ रुग्ण बरे झाले आहेत. येथे मृतांची संख्या चार आहे. अमरावती जिल्ह्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या ४४३ झाली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या १९ झाली आहे. आतापर्यंत ३०० रुग्ण बरे झाले असून १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ५७ असून यातील ४३ रुग्ण बरे झाले आहेत. १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुलढाण्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. या जिल्ह्यात आज दोन रुग्णाचा मृत्यूने खळबळ उडाली. मृतांची संख्या १० झाली आहे. १२२ रुग्ण बरे झाले असून ३४ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.