नागपूर : विदर्भात वाढत असलेल्या मृत्यूने कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे. सोमवारी ९९ मृत्यू व ६,४४३ रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले. ५७ मृत्यू व ६,३०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यातही मागील काही दिवसापासून मृत्यूची संख्या वाढली आहे. आज १० रुग्णांचे जीव गेले तर ३०१ रुग्ण आढळून आले. भंडारा जिल्ह्यात ९ मृत्यू व ६५६ रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात ५ मृत्यू व २६५ रुग्ण, अकोला जिल्ह्यात ४ मृत्यू व २०३ रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात ३ मृत्यू ७३ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात २ मृत्यू व २५५ रुग्ण तर, वाशिम जिल्ह्यात २ मृत्यू व १६० रुग्णांची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात आज शून्य मृत्यूची नोंद होती. ३०१ बाधित रुग्ण आढळून आले.
नागपूर : ३,५१९ : ५७
गडचिरोली : ७३ : ०३
चंद्रपूर : २६५ : ०५
भंडारा : ६५६ : ०९
गोंदिया : २५५ : ०२
वर्धा : १३६ : ०२
अमरावती : २४१ : ००
यवतमाळ : ३०१ :१०
बुलडाणा : ६३४ : ०५
अकोला : २०३ : ०४
वाशिम : १६० :०२