आॅनलाईन लोकमतनागपूर: भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता बाजारपेठा, सरकारी व खाजगी वाहतूक सेवा, शैक्षणिक संस्था व अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांनी सकाळीच मोर्चे काढून सुरू असलेली काही दुकाने बंद करण्याचे आवाहन केले तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती. काही ठिकाणी तणावाचेही वातावरण निर्माण करणाऱ्या किरकोळ घटना घडल्याचे वृत्त आहे.चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मूलच्या बसस्थानकावर अनेक प्रवासी सकाळच्या वेळेस अडकून पडले होते. सिंदेवाही व नागभीड येथे कडक
महाराष्ट्र बंदला विदर्भात जोरदार प्रतिसाद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:04 PM
भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे.
ठळक मुद्देअनेक बसस्थानकांवर प्रवासी अडकलेपेट्रोलपंप बंदचा नागरिकांना फटकाखासगी बसेसही बंदवैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद