आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भातीलच दोन उमेदवार एकमेकांसमोर आव्हान उभे करीत असताना विदर्भ साहित्य संघ कुणाच्या डोक्यावर आपला हात ठेवेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पण, मी निश्चिंत आहे. कारण, याच विदर्भ साहित्य संघाने मला याआधी नरखेडचे जनसाहित्य संमेलन व गोंदियात झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन गौरविले आहे आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मदत करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. किशोर सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आतापर्यंत झालेल्या प्रचार यात्रेचा लेखाजोखा मांडताना डॉ. सानप म्हणाले, आतापर्यंत पाच हजार किमीचा प्रवास पूर्ण झाला आहे. उद्यापासून मी पुन्हा दौऱ्यावर निघतो आहे. मतदारांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. वाद मला आवडत नाहीत.सुसंवादावर माझा भर राहणार आहे. कुठल्याही प्रतिभेला नैतिकतेचा आधार असायला हवा, या विचारांचा मी आहे. या निवडणुकीतील इतर उमेदवार माझे प्रतिस्पर्धी असले तरी सर्व चारित्र्यवान व प्रतिभावंत आहेत. त्यांच्या वाङ्मयीन योगदानाचा मी सन्मान करतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.गोव्यातील साहित्य- सांस्कृतिक क्षेत्रातील प्रख्यात कवी विष्णू सूर्या वाघ यांच्य कवितासंग्रहावर गुन्हा दाखल झालाय. मुस्कटदाबीच्या या अजब प्रयोगाविषयीही डॉ. सानप यांनी यावेळी निषेध व्यक्त केला.शोभणे माझा लहान भाऊडॉ. रवींद्र शोभणे माझे प्रतिस्पर्धी असले तरी मी त्यांना माझा लहान भाऊच मानतो. त्यांच्या पुस्तकांवर मी लिहिले आहे. त्यांचेही काम मोठेच आहे. मी उमेदवारांची क्रमवारी ठरवली हे खरे आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे वृत्तपत्रातून जे काही प्रसिद्ध होत आहे त्याबद्दल माझा काहीही आक्षेप नसल्याचे डॉ. सानप यांनी सांगितले.
विदर्भ साहित्य संघ माझ्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:35 AM
विदर्भ साहित्य संघ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मदत करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. किशोर सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ठळक मुद्देकिशोर सानप यांची पत्रपरिषदमांडला प्रचार यात्रेचा लेखाजोखा