शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

विदर्भ साहित्य संघाचे आयोजन : राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव यंदा चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:35 PM

विदर्भ साहित्य संघ आणि चांदा क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाचा राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव यावर्षी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजुने-नवे लेखक, कवी, वक्ते, अभ्यासक सहभागी होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भ साहित्य संघ आणि चांदा क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाचा राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव यावर्षी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवादरम्यान महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील मराठी व हिंदी भाषक जुने जाणते आणि नवोदित लेखक, कवी, वक्ते, अभ्यासक सहभागी होणार आहेत.चांदा क्लबच्या चांदा मैदानावर येत्या २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी हा महोत्सव होणार असून माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला आहे. चंद्रपूरला यापूर्वी दोन अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि दोन विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे महोत्सवाचे स्वागताध्यक्ष असून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे संरक्षक आहेत. चांदा क्लबचे सचिव डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित हे कार्याध्यक्ष तर सुनील देशपांडे कार्यवाह तसेच डॉ. राजीव देवईकर, प्रशांत आर्वे, इरफान शेख यांची सहकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या गोंडवाना शाखेचे अध्यक्ष डॉ. शरद सालफले हे आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग आणि सरचिटणीस विलास मानेकर यांच्या मार्गदर्शनात महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. या महोत्सवासोबत चांदा क्लबतर्फे चार दिवसाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही होणार असून मराठीसह अन्य भाषांमधील प्रकाशक व पुस्तक विक्रेते यामध्ये सहभागी होणार आहेत. कविसंमेलन, कथाकथन, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रकट मुलाखती, विविध विषयावरील परिसंवाद व सोबत पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक-सांगितिक कार्यक्रमांची मेजवानी महोत्सवाच्या माध्यमातून साहित्य व कलारसिकांना मिळणार आहे.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ