लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात दुसऱ्या दिवशीही चार हजारावर रुग्णसंख्या गेली. शुक्रवारी ४,२३५ रुग्ण व ३७ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ३,६१,८६९ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात १,९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले व १५ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.नागपूर शहरात शनिवारपासून नऊ दिवस लॉकडाऊन आहे. याचा किती प्रभाव रुग्णसंख्येवर होतो. याकडे प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे. नागपूरनंतर बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ५३७ रुग्ण व ७ मृत्यू झाले.
अमरावती जिल्ह्यात ४४८ रुग्ण व २ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ३५३ रुग्ण व ४ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ३६५ रुग्ण व ३ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात १५६ रुग्ण व ४ मृत्यूंची भर पडली. विदर्भात रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालयातील खाटाही फुल्ल होऊ लागल्या आहेत. अमरावती व अकोल्यातील गंभीर रुग्ण नागपुरात येत आहेत.
जिल्हा रुग्ण एकूण रुग्ण मृत्यूनागपूर १९५७ १६५९८९ १५चंद्रपूर ७५ २४५५६ ०१गोंदिया २६ १४६६६ ००भंडारा ७५ १४१९३ ००वर्धा १५६ १४३९८ ०४गडचिरोली २१ ९८१७ ००यवतमाळ ३६५ २०९१९ ०३बुलडाणा ५६७ २४१०७ ०७वाशिम १९२ १०९०४ ०१अकोला ३५३ २०५८९ ०४अमरावती ४४८ ४१७३१ ०२