आॅनलाईन लोकमतनागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)तर्फे येत्या रविवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स येथे विदर्भ राज्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन रिपाइं (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येईल.रिपाइं (ए)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत विदर्भ विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत, आ. रवी राणा, आ. अनिल बोंडे, आ. आशिष देशमुख, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, आदिम नेत्या अॅड. नंदा पराते, विदर्भ माझाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे हे विदर्भवादी नेते प्रमुख मार्गदर्शक राहतील. यासोबतच अहमद कादर, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील, अनिल गोंडाणे, भीमराव बन्सोड, एल.के. मडावी प्रामुख्याने उपस्थित राहतील.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. या परिषदेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव मंजूर केला जाईल. या ठरावासंबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले चर्चा करतील. भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव याच कार्यकाळात मंजूर करावा, अशी आमची आग्रही मागणी राहील, असेही त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला भीमराव बन्सोड, आर.एस. वानखेडे, राजन वाघमारे, बाळू घरडे, भीमराव मेश्राम, डॉ. मनोज मेश्राम, हरीश जानोरकर, विनोद थूल, हरीश लांजेवार, नंदू गावंडे, सौरभ थुलकर आदी उपस्थित होते.विधानभवनावर मोर्चायेत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रिपाइं (ए)तर्फे विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल. याबाबतही परिषदेत चर्चा केली जाईल. तसेच जानेवारीमध्ये विदर्भ यात्रा काढण्यात येणार असल्याचे थुलकर यांनी सांगितले.