शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

विदर्भ पर्यटनाचे ‘डेस्टिनेशन’

By admin | Published: September 27, 2015 2:34 AM

विदर्भ हा मुबलक वनसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्याचा धनी आहे.

जागतिक पर्यटनदिन विशेष : पर्यटकांची संख्या वाढली लोकमत विशेषजीवन रामावत नागपूरविदर्भ हा मुबलक वनसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्याचा धनी आहे. येथील हिरवीगार वनराई, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटनस्थळे देश-विदेशातील पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेली असून, विदर्भ पर्यटनाचे ‘डिस्टिनेशन’ बनले आहे. पूर्व विदर्भात घनदाट जंगल आहे. यात महाराष्ट्रातील सर्वात जुना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. हा प्रकल्प देशातील २५ अग्रगण्य व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. शिवाय उपराजधानीपासून काहीच किलोमीटर अंतरावर पेंच व्याघ्र प्रकल्पासह नवेगाव-नागझिरा, उमरेड-कऱ्हांडला, बोर, मानसिंगदेव, मेळघाट व टिपेश्वरसारखी अभयारण्ये आहेत. येथील जंगलात पट्टेदार वाघासह बिबट, लांडगा, अस्वल, रानगवा, रानकुत्रे, तडस, उदमांजर, रानमांजर, सांबर, चितळ, नीलगाय व भेकर यासारख्या वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. याशिवाय चिखलदरा येथील थंड हवेचे ठिकाण, तोतलाडोह, अकोला, गाविलगड, सानगडी, सीताबर्डी, नगरधन, भिवगड, बल्लारशा, अंबागड व गोंड राजाचा ऐतिहासिक किल्ला पर्यटकांना आकर्षित करीत आहे. विदर्भात निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण करणारी सृष्टी आहे. येथील वनराई मनाला भुरळ घालणारी आहे. मागील काही वर्षांपर्यंत पर्यटनदृष्ट्या फार प्रकाशझोतात नसलेला विदर्भ आज देश- विदेशातील पर्यटकांना खुणावत आहे. भौगोलिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या विदर्भात सर्वाधिक वनसंपदा आहे. विविध ठिकाणी लहान-मोठ्या नद्या, नाले, तलाव व धरणे आहेत. येथील हिरव्यागर्द डोंगरांमुळे विदर्भाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. विदर्भाचे भौगोलिक स्थान व हिरव्या निसर्गसृष्टी पर्यटकांना आकर्षित करीत आहे. यामुळेच पर्यटक महाराष्ट्रातील कोकणानंतर विदर्भाला पसंती देऊ लागले आहेत. विशेषत: विदर्भातील व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात दररोज हजारोंनी पर्यटक दाखल होतात. यात गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यातील पर्यटकांसह मुंबई व पुणे या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आतापर्यंत पर्यटक केवळ गुजरात, मध्य प्रदेश व गोव्यातील पर्यटनालाच महत्त्व देत होते, परंतु आता त्यात विदर्भानेही स्थान मिळविले आहे. पर्यटन हंगामाला खऱ्या अर्थाने दिवाळीपासून सुरुवात होते. त्याला आता अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यादिशेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. मात्र असे असले तरी अजूनपर्यंत विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासाला हवी तेवढी गती मिळालेली नाही. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधांचा फार मोठा अभाव आहे. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. त्यामुळे पुढील काळात विदर्भातील पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पर्यटनातून रोजगाराच्या संधी पर्यटनातून आनंद मिळातो, शिवाय रोजगाराच्या संधीही मिळतात. या क्षेत्रात वर्ग-१ ते वर्ग-४ पर्यंत रोजगाराच्या संधी आहेत. एवढेच नव्हे, तर या क्षेत्रात दहा लाखांची गुंतवणूक केल्यास ८९ नवीन रोजगार निर्माण होतात. इतर उद्योगात मात्र हे प्रमाण केवळ १३ टक्के आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखताना रोजगाराचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळेच जगातील अनेक देशांनी पर्यटनाला प्राधान्य दिले आहे. दुबई, मलेशिया, सिंगापूर व श्रीलंका सारख्या लहान-लहान देशांनी पर्यटनाच्या बळावर बरीच प्रगती केली आहे. महाराष्ट्रातसुद्धा विपुल वनसंपदा आहे. वन खात्याचा मंत्री म्हणून पर्यटनातून रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, याकडे माझे विशेष लक्ष राहणार आहे. - सुधीर मुनगंटीवार, वनमंत्रीविदेशी पर्यटक वाढले मागील काही वर्षांत विदर्भात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. शिवाय देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करू न दिल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एमटीडीसी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान मुंबई येथे होत असलेल्या महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट महोत्सवात सहभागी होणार आहे. तसेच या ट्रॅव्हल मार्टमध्ये भाग घेतलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय २० टूर आॅपरेटरसाठी ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या काळात ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प येथे ‘फॅम टूर’ आयोजित केला आहे. या उपरोक्त जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्घतीने पर्यटन निवास, विमानतळ व प्रादेशिक कार्यालयात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यात येणार आहे.-हनुमंत हेडे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी ...तर विदर्भात डॉलरचा पाऊस जगाचा ओढा नागपूरकडे वाढतो आहे. मात्र त्याचवेळी राज्य शासन येथील पर्यटनाकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्य शासन व एमटीडीसीने येथील पर्यटन स्थळांचा विकास केला तर येथे डॉलर्सचा पाऊस पडू शकतो. ताडोबा, तोतलाडोह व मेळघाट येथे विदेशी पर्यटकांची गर्दी होऊ शकते. कार्गो आणि मिहानमुळे दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे. अशा सुलभ वातावरणात विदर्भातील पर्यटन स्थळे आणि व्याघ्र प्रकल्पांचा विकास झाला तर येथे प्रचंड प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यटन उद्योग हा जगात सर्वाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करू न देणारा उद्योग आहे. त्यामुळे एकदा का परदेशी पर्यटक येथे येऊ लागले हॉटेल, टॅक्सी, गाईड, डेली नीडस् यासारखे कितीतरी उद्योग मुसंडी मारतील.-चंद्रपाल चौकसे, पर्यटक मित्रजंगल सफारीची ‘बूम’पर्यटकांमध्ये जंगल व तेथील वाघाविषयी पूर्वीपासून आकर्षण राहिले आहे. यातूनच मागील काही वर्षांत जंगल सफारीचे फारच ‘बूम’ वाढले आहे. यामुळे विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर, उमरेड-कऱ्हांडला, मानसिंगदेव व टिपेश्वर अभयारण्य वर्षभर हाउसफुल्ल राहत आहे. यात तरुण पर्यटकांची फार मोठी संख्या दिसून येत आहे. ताडोबा- अंधारी येथील जंगल सफारीसाठी पर्यटकांना चार-चार महिन्यांचे वेटिंग करावे लागत आहे. विदर्भातील पर्यटनासाठी हे शुभसंकेत असून, ताडोबापाठोपाठ आता पेंच व्याघ्र प्रकल्प व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य लोकप्रिय ठरत आहे. यातून वन विभागाच्या उत्पन्नात चांगलीच भर पडत आहे. परंतु असे असताना त्या निधीचा पर्यटन विकासासाठी कुठेही उपयोग होताना दिसून येत नाही. वन विभागाने ही उणीव भरू न काढण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी पर्यटनाकडे ओढामागील काही वर्षांपासून शहरी लोकांचा कृषी पर्यटनाकडे ओढा वाढला आहे. यातून विदर्भातील कृषी पर्यटन फुलत आहे. विदर्भातील काही सधन शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. शहरी लोकांना शेती, विविध वृक्ष व फळझाडांचे आकर्षण राहिले आहे. यातूनच ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना पुढे आली आहे. यात कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी विभागाने स्वत: सिव्हिल लाईन्स येथील कदीमबाग नर्सरीत ‘कृषी पर्यटना’ची योजना आखली आहे. यात शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचा विकास करू न तेथे पर्यटनासाठी सोयीसुविधा उपलब्ध करतो. यातून शहरी लोकांना पर्यटनाचा आनंद मिळत असून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत आहे.