लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर या विदर्भातील मिरचीच्या प्रमुख उत्पादक क्षेत्रासह लासलगाव, नांदेड आणि आदिलाबादसह राज्याच्या शेजारी राज्यातून येणारी लाल मिरची सध्या संप व बंदच्या चटक्यांनी त्रस्त आहे. एकीकडे ट्रक मालकांचा संप तर शहरात विविध आंदोलनांमुळे पुकारण्यात येणारा बंद यामुळे नागपुरातील कळमना या धान्य बाजारात आलेली मिरची व्यापाऱ्यांच्या प्रतिक्षेत तिष्ठत आहे. तशात सध्या पावसाचे दिवस असल्याने मिरचीची योग्य निगा राखण्याची जबाबदारीही येथे काम करणाऱ्या कामगार स्त्रियांना पार पाडावी लागत आहे. भिवापूर या गावी मिरची 'फुलकट' करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. फुलकट म्हणजे मिरचीची देठे तोडणे. या कामासाठी आंध्र प्रदेश राज्यातूनही येथे मिरची येते. भिवापूरहून मिरची व हळद विदेशातही जाते. इथले कामगार तिखट मिरची हाताळण्यात वाकबगार आहेत.भिवापूर नगरीत जवळपास १० ते १५ मिरची केंद्रे आहेत.आवक झालेल्या मिरचीचे ट्रक रिकामे केल्याने कळमना बाजारात सध्या सर्वत्र लाल गालिचा अंथरल्यागत दृष्य पहावयास मिळते आहे.
विदर्भातील मिरचीला बसले संपाचे ‘चटके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:54 AM
भिवापूर या विदर्भातील मिरचीच्या प्रमुख उत्पादक क्षेत्रासह लासलगाव, नांदेड आणि आदिलाबादसह राज्याच्या शेजारी राज्यातून येणारी लाल मिरची सध्या संप व बंदच्या चटक्यांनी त्रस्त आहे.
ठळक मुद्देविविध भागातून येते बहुगुणी मिरची