शशिकांत भट : प्राचीन नाण्यांवर आंतरराष्ट्रीय परिषदनागपूर : विदर्भाचा मुद्राशास्त्र इतिहास फार विकसित आहे. विदर्भात राजघराण्यांची नाणी मोठ्या संख्येत आढळून येत आहेत. आपल्या प्रदेशाच्या इतिहासाप्रति असलेल्या आत्मियतेमुळे नागरिकांचा नाणे संग्रह व त्याविषयी ज्ञान मिळविण्याची रुची वाढत आहे, असे मुद्राशास्त्र तज्ज्ञ प्रा. शशिकांत भट यांनी रविवारी ‘लोकमत’शी चर्चा करताना सांगितले.इंडियन कॉईन सोसायटीतर्फे एका हॉटेलमध्ये आयोजित प्राचीन नाण्यांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ते येथे आले होते. विदर्भात वाकाटक व अन्य राजघराण्यांची नाणी आढळून येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नाण्यांवर संशोधन होत आहे. प्राचीन नाण्यांमुळे भारतीय संस्कृती, इतिहास व ज्ञानाविषयी नवीन माहिती प्राप्त होत आहे. विदर्भात मुद्राशास्त्र क्रांती प्रगतीवर आहे, अशी माहिती भट यांनी दिली.प्राचीन नाणी ज्ञानदूतासारखी असल्यामुळे त्यांचा संग्रह केला गेला पाहिजे. यासंदर्भात सर्वत्र जनजागृती करणे आवश्यक आहे. नागपुरात नाणे संग्रह व संवर्धनाप्रति आकर्षण वाढत आहे. गुप्तवंशाच्या नाण्यांमध्ये कलात्मकता, संस्कृती, राजकीय व सामाजिक अवस्था, भव्यता, आकर्षण, पराक्रम, युद्ध कौशल्य आणि तत्कालीन वैशिष्ट्ये दिसून येतात, असे भट यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
विदर्भाचा मुद्राशास्त्र इतिहास विकसित
By admin | Published: January 18, 2016 2:46 AM