शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

विदर्भाचा सावजी, वऱ्हाडी  तडका : महाराष्ट्र फूड फेस्टिव्हलमध्ये खवय्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:18 AM

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या सहयोगाने जेवणाची लज्जत घडविणाऱ्या महाराष्ट्र  फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात हा खाद्य महोत्सव सध्या नागपूरकर आणि हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या लोकांच्या जिभेला पाणी सोडत आहे.

ठळक मुद्देचुलीवरचे जेवण, पापलेट अन् खान्देशी हुरडा

आॅनलाईन लोकमतनागपूर : मराठवाड्याचे खास वैशिष्ट्य असलेले चुलीवरचे व्हेज-नॉनव्हेज जेवण अनुभवायचेय, कोकण-मालवणच्या सुरमई, बोंबील व पापलेटवर यथेच्छ ताव मारायचाय आणि खान्देशमधील ज्वारीच्या हुरड्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र  फूड फेस्टिव्हलच्या खाद्य महोत्सवाला नक्कीच भेट द्या; सोबतच नागपुरात खवय्यांची खास आवड असलेले वऱ्हाडी थाट आणि सावजी भोजनाची लज्जतही घ्यायला मिळेल.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या सहयोगाने जेवणाची लज्जत घडविणाऱ्या महाराष्ट्र  फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात हा खाद्य महोत्सव सध्या नागपूरकर आणि हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या लोकांच्या जिभेला पाणी सोडत आहे.महाराष्ट्र त दर १५ ते २० किलोमीटरच्या अंतरावर भाषेचा लहेजा बदलतो तशी भोजनाचा प्रकारही बदलतो. नागपूर-विदर्भाचे वऱ्हाडी व सावजी भोजन जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे कुठूनही नागपुरात आलेला माणूस जेवणासाठी सावजी जेवणाची मागणी करतोच. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा कुणाच्याही जिभेला पाणी सोडतो. कोकण-रत्नागिरीकडचे जेवण, खान्देश, मराठवाड्याच्या भोजनाची लज्जतही अशीच वेगळी आहे. या सर्व खाद्य संस्कृतीचे दर्शन एका छताखाली खवय्यांना होत आहे.मराठवाड्याकडच्या माणसांना व्हेजमध्ये शेवगा मसाला व नॉनव्हेजमध्ये मटन व चिकन ठेच्याची खास आवड. सोबत ज्वारी, बाजरी आणि तिळाची भाकरही त्यांना हवी असतेच. असे सर्व पण चुलीवर तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी येथे चालून आली आहे. खान्देशचे वैशिष्ट्य असलेल्या स्टॉलवर ज्वारीचा हुरडा, तिकडेच मिळणारे खास मटन मांडे, कंदुरी मटन, जळगावकडचे वांगे भरीत आणि नागली पापडही लोकांना आकर्षित करीत आहे. पापलेट म्हटले की प्रत्येकाला कोकणची आठवण येते. कोकण-मालवणची खास लज्जत घडविणारे स्टॉल येथे आहेत. सुरमई, बांगडा, बोंबील आदी माशांचे जेवण, झिंग्याचे वडे, खास वांगे आणि झिंगामिश्रित मसाला नक्कीच पोटाची भूक वाढविणार नाही तर नवल. यामध्ये वऱ्हाडी आणि सावजीचा तडका जोडलेला आहे, हे विसरू नका. येथे असलेले काही स्टॉल खास वऱ्हाडी जेवणाचे वैशिष्ट्य दर्शविणारे आहेत. मानकामाय महिला बचत गटाच्या स्टॉलवर सावजीचा रस्सा जिभेला पाणी सोडतो. शाकाहार आवडणाऱ्यांसाठीही येथे लज्जतदार भोजनाची कमी नाही.महोत्सवामध्ये आईसक्रीम आणि गोड पदार्थांचे इतरही स्टॉल आहेत. फास्ट फूडला पर्याय म्हणून पाठकांचे खास वऱ्हाडी टच असलेले देशी फास्ट फूडही लोकांना आकर्षित करणारे आहेत. अनेक प्रकारच्या भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळत असल्याने नागपूरकरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. महोत्सव २५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, उपाध्यक्ष कुंदाताई विजयकर आणि डॉ. सुधीर कुण्णावार, सचिव ज्योत्स्ना पंडित, सहसचिव देवेंद्र दस्तुरे तसेच छायाताई गाडे, विवेक मोरोणे, गीता छाडी यांचा सहभाग आणि आश्रयदाते अटलबहादूरसिंह, कांचन गडकरी, दत्ता मेघे, गिरीश गांधी व प्रभाकरराव मुंडले यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे.- सुमतीताई सुकळीकर यांना आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढणे, पाहुणचार, सरबराई करणे आवडायचे. सुदैवाने त्यांच्या आठवणीत सुरू केलेल्या आमच्या प्रतिष्ठानाला पर्यटन विभागाकडून हा महोत्सव राबविण्याची संधी मिळाली. हृदयाचा रस्ता पोटातून जातो, असे म्हणतात. या माध्यमाने   महाराष्ट्रीयन लोकांच्या पोटातून हृदयात जाण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. राज्यातील विविध भागातील खास ओळख असलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी येथे लोकांना मिळत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीपासून लोकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. २५ डिसेंबरपर्यंत महोत्सव चालणार आहे. नागपूरकरांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.- डॉ. प्रवीण पोतदार, प्रोजेक्ट डायरेक्टर, महाराष्ट्र  फूड फेस्टिव्हल व कोषाध्यक्ष, सुमतीताई स्मृती प्रतिष्ठान.

 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर