शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

वीजदराविरोधात विदर्भवाद्यांचा मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:23 AM

महागड्या वीज दराच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेने १७ किलोमीटरचा मार्च काढला. पण आंदोलकांचे समाधान न झाल्याने, आक्रमक झालेल्या विदर्भावाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देविदर्भवादी झाले आक्रमक पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली, गुजरात छत्तीसगड, हरियाणा या राज्याच्या तुलनेत सर्वाधिक महागडी वीज विदर्भातील जनतेला खरेदी करावी लागत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात विजेचे सर्वाधिक उत्पादन होत असतानाही, सरकार विदर्भातील जनतेवरच अन्याय करीत आहे. या अन्यायाच्या विरोधात आणि महागड्या वीज दराच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेने १७ किलोमीटरचा मार्च काढला. पण आंदोलकांचे समाधान न झाल्याने, आक्रमक झालेल्या विदर्भावाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप, राम नेवले, अरुण केदार यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून भव्य मार्च ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानवर धडकला. बुलडाण्यापासून आमगावपर्यंत विदर्भवादी नेते व कार्यकर्ते या मार्चमध्ये सहभागी झाले होते. १७ किलोमीटरच्या पायी मार्चमध्ये वीज दर कमी करा, विदर्भातील प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करा, वेगळा विदर्भ मिळालाच पाहिजे अशा घोषणा आंदोलकांनी केल्या. संविधान चौकातून निघालेल्या मार्चला कोराडी येथील महादुला चौकात थांबविण्यात आले. यावेळी विदर्भवाद्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या भेटीचा आग्रह धरला. परंतु ते नागपुरात नसल्याने त्यांचे विशेष कार्य अधिकारी शिवराज पडोळे यांच्याशी आंदोलनकर्त्यांची चर्चा झाली. चर्चेमधुन काहीच निष्पन्न न झाल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी कोराडी चौकात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलकांची आक्रमकता बघून अखेर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. आंदोलनात श्रीनिवास खांदेवाले, रंजना मामर्डे, विजया धोटे, तेजराज चौरे, मुकेश मासुरकर, चंद्रशेखर कुईटे, प्रवीण डांगे, विनायक खोरगडे, अरुण भोसले, मधुसुदन हरणे, विठ्ठल इंगोले, अ‍ॅड. अजय चामडिया, पुरुषोत्तम पाटील, सुनील वडस्कर, कृष्णा वानखेडे, दीपक बेले, वसंतराव वैद्य, रवि हटकर, नंदू बेगड, संतोष खाडे, तुळशीराम कोठेकर, देवीदास देशमुख, वीरेंद्र इंगळे, अर्चना भगत, आदींचा समावेश होता.

टॅग्स :agitationआंदोलन