आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भातील पाच कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत बघून बोलण्याचा आनंद घेता येणार आहे. पुढच्या काही दिवसांत नातेवाईकांना बंदिस्त कैद्यांची भेट घेण्यासाठी वारंवार पायपीट करण्याची गरज पडणार नाही. भेटीचा दिवस आणि वेळ ठरविण्यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय विचाराधीन आहे, अशी माहिती महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांना दिली. ही सुविधा नागपूर, अमरावती, मोर्शी, अकोला आणि गडचिरोली येथे सुरू करण्यात येणार आहे.महाराष्ट्राच्या विविध कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने डॉ. उपाध्याय यांनी दोन वर्षांपासून ‘तिमिरातून तेजाकडे’ या विशेष उपक्र माचे आयोजन केले आहे. यंदा हा नृत्य, नाट्य आणि गीत-संगीताचा कार्यक्र म शुक्र वारी रात्री देशपांडे सभागृहात पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव आणि प्रधान सचिव गृह विभाग (तुरुग) या सांस्कृतिक कार्यक्र माला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्यासंबंधाने डॉ. उपाध्याय यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी नागपूर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई आणि कारागृह अधीक्षक राणी भोसले हजर होते. राज्यातील कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासोबतच कैद्यांना चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. कैद्यांचे वर्तन चांगले राहावे म्हणून विशेष उपक्र म राबविण्यात येत आहे. त्यापैकीच हा एक उपक्र म आहे. कैद्यांना अंधारातून उजेडाकडे (तिमिरातून तेजाकडे) नेण्याची त्यामागची संकल्पना आहे. त्यांची कला इतरांना बघता यावी, त्यांनाही दाद मिळावी असे प्रयत्न कारागृह प्रशासन करीत आहे. सांस्कृतिक रजनीचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. बालपणापासून दोन जीवाभावाचे मित्र महाविद्यालयीन शिक्षणानंतर थेट कोर्टात समोरासमोर येतात. त्यातील एक आरोपी असतो आणि दुसरा असतो तुरुगाधिकारी. त्यांचा नाट्यमय जीवन प्रवास कारागृहातील कैदी नाट्य, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून उलगडून दाखवणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्र मासाठी नागपुरातील २० आणि ठिकठिकाणचे ८० कैदी गेल्या ३ महिन्यांपासून सराव (प्रॅक्टिस) करीत आहेत.कारागृहात रटाळ जीवन जगणाऱ्या कैद्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी आणि चांगल्या वर्तनामुळे कारागृहातून परत जाण्याची उमेद मिळावी म्हणून अशा कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येत असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. या कार्यक्र मात सहभागी होणा-या कैदी कलावंतांना बक्षिस म्हणून त्यांच्या शिक्षेत काही दिवसांची माफी दिली जाते, असेही ते म्हणाले.पं. बंगालच्या धर्तीवर जेल बॅण्डशुक्र वारी सादर होणारा कार्यक्र म नृत्य, नाट्य, कॉमेडी आणि गीत - संगीत असा मिश्र स्वरूपाचा असला तरी पं. बंगालच्या धर्तीवर एक चांगला जेल बॅण्ड (आॅर्केस्ट्रा) तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. पं. बंगालच्या कारागृहातील बॅण्ड देशभरात प्रसिद्ध आहे. तो दोन - दोन लाख रु पये घेऊन ठिकठिकाणी सादरीकरण करतो. सरकारचीही त्याला मान्यता आहे. तशा प्रकारची सुविधा आणि मान्यता सरकारकडून मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.मुलांची गळाभेट कौतुकाचा विषयतुलनेत देशातील कारागृहाची व्यवस्था चांगली आहे. अनेक देशात कैद्यांना मानवी हक्क नाकारला जातो, असे सांगताना त्यांनी फिजी देशात झालेल्या कारागृह महानिरीक्षकांच्या पाच दिवसीय आंतराष्टीय परिषदेचे अनुभव कथन केले. या परिषदेत भारतातून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह तीन शिर्षस्थ अधिकारी सहभागी झाले होते. अनेक देशात कैद्यांना मानवी हक्क नाकारले जातात. ते त्यांना गुन्हेगार म्हणून क्रूर वागणूक देत असतात. राज्यात राबविण्यात येत असलेला कैद्यांच्या मुलांचा गळाभेट कार्यक्रम हा या परिषदेत कौतुकाचा विषय ठरला होता.मेलशिया, इंडोनेशियासह अनेक देशात कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. जॅमर ही व्यवस्था बहुतांश कारागृहात फेल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामागचे तांत्रिक कारणही त्यांनी सांगितले. तुलनेत सिंगापूर, हाँगकाँगमध्ये चांगली व्यवस्था आहेत. कारण तिकडच्या कारागृहात कैद्यांची संख्या फारच कमी असते. भारत, बांगलादेश सारख्या देशातील कारागृहात मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक जास्त कैदी कारागृहात पाठवले जात असल्याने सुरक्षेसंबंधाने विविध समस्या निर्माण होतात. हे एक प्रकारचे आव्हानच आहे, असे ते म्हणाले. सुरक्षेच्या संबंधाने सीसीटीएनएसच्या प्रणालीचा वापर केला जाणार असल्याचीही माहिती डॉ. उपाध्याय यांनी दिली. नागपूर - विदर्भातील कारागृहातील सुधारणा आणि व्यवस्थेबाबत उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी माहिती दिली. कलावंत कैद्यांच्या सरावाची आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचीही देसाई यांनी माहिती दिली.
विदर्भातील पाच कारागृहात व्हिडिओ कॉलिंगची सुविधा; मुख्यमंत्र्यांसमोर शुक्र वारी सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:13 PM
विदर्भातील पाच कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत बघून बोलण्याचा आनंद घेता येणार आहे.
ठळक मुद्देकारागृहातील बंदिवान तिमिरातून तेजाकडे