लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येत्या ४ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सोमवारी सचिवालयाचे कामकाज सुरू झाले असून विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी विधानभवन परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईहून कर्मचारी दाखल झाले असून सचिव स्तरावरील अधिकारी हे १ जुलैला येतील. विधिमंडळ सचिवालयाचे ग्रंथालय, प्रश्न शाखा सुरू झाल्या आहेत. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकडून आॅनलाईन तारांकित प्रश्न स्वीकारण्यासही सुरुवात झाली आहे. २८ जूनपासून लक्ष्यवेधी स्वीकारण्यात येतील. विविध कागदपत्रे, फायली तयार करण्यात येत आहे. तीन आठवड्याचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाज तहकूब होईल. कामाचे तास वाढावे, जास्तीत जास्त कामकाज व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची परंपरा खंडित करून इतर कामकाजातही गोंधळ होणार नाही, यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते. विधानभवनात रेलचेल वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे.ग्रंथालय सुरूअधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळाचे ग्रंथालय सुरू झाले आहे. ग्रंथालयात विधिमंडळाशी संबंधित स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आतापर्यंतचे जवळपास सर्व संदर्भ ग्रंथालयात उपलब्ध आहे. पीएचडी करणाऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. ग्रंथालयाचे कामकाज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल.चौथे पावसाळी अधिवेशनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील पहिले पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. यापूर्वी तीन पावसाळी अधिवेशन नागपूर येथे झाले आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा पावसाळी अधिवेशन नागपूर येथे झाले होते. त्यावेळी अधिवेशन २५ दिवस चालले होते. त्यानंतर वसंतराव नाईक मुुख्यमंत्री असताना १९६६ ला पावसाळी अधिवेशन झाले होते. २६ दिवस अधिवेशन चालले होते. त्यानंतर १९६८ ला पुन्हा पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळीही वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते.
नागपूर विधानभवन सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:26 AM
येत्या ४ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सोमवारी सचिवालयाचे कामकाज सुरू झाले असून विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी विधानभवन परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.
ठळक मुद्देविधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू : सचिव स्तरावरील अधिकारी १ जुलैला येणार