जिथे हुकुमशाही सुरू होते, तिथे माणूस संपतो.. बावनकुळेंचा पटोलेंना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 10:38 AM2021-12-14T10:38:39+5:302021-12-14T11:12:24+5:30

काँग्रेसने आपला उमेदवार वेळेवर बदलला त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसमध्ये प्रचंड गदारोळ होता, काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला, असे बावनकुळे म्हणाले.

vidhan parishad election result chandrashekhar bavankule reaction after victory | जिथे हुकुमशाही सुरू होते, तिथे माणूस संपतो.. बावनकुळेंचा पटोलेंना टोला

जिथे हुकुमशाही सुरू होते, तिथे माणूस संपतो.. बावनकुळेंचा पटोलेंना टोला

googlenewsNext
ठळक मुद्दे विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून मोठा जल्लोष केला जात आहे. विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.  

या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. विजयानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले. काँग्रेसने आपला उमेदवार वेळेवर बदलला. त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसमध्ये प्रचंड गदारोळ होता, काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दबावात येऊन वेळेवर उमेदवार बदलल्याचा फटका त्यांना बसला. महाविकास आघाडीची आम्हाला ४४ मतं मिळाली हा हुकुमशाहीचा परिणाम आहे, असे म्हणत, जिथे हुकुमशाही सुरू होते, तिथे माणूस संपतो असाही टोलाही बावनकुळेंनी लगावला. हा पटोलेंचा पराभव असल्याचे म्हणत त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले. आमच्याकडे घोडेबाजार झाला नाही तर काँँग्रेसकडे झाला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, या मतदानासाठी भाजपकडे ३१८ मते होती. मात्र बावनकुळे यांना प्रत्यक्षात ३६२ मते मिळाली. भाजप उमेदवार बावनकुळेंना त्यांच्याकडे असलेल्या मतांच्या कोट्यापेक्षा तब्बला ४४ मते अधिक मते मिळातील. महाविकास आघाडीची ४४ मते फोडण्यात भाजपाला यश आले. तर मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले. 

काँग्रेसने उमेदवार आयात केल्याने आधीच कार्यकर्ते नाराज होते. तर, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसने उमेदवार बदलल्याने गोंधळ वाढला होता. याचाच फटका काँग्रेसला बसला असल्याचं बोललं जात आहे. 

Web Title: vidhan parishad election result chandrashekhar bavankule reaction after victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.