एक जखमी : मोवाड परिसरातील घटनानरखेड : शिकवणी वर्गाला सायकलने जात असलेल्या दोन विद्यार्थिनी पावसाला सुरुवात झाल्याने झाडाच्या आडोशाला थांबल्या. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झाडावर कोसळली. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोवाड-खैरगाव मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.उषा अशोक चौधरी (१५, रा. खैरगाव, ता. नरखेड) असे मृत तर धनश्री बाबाराव मेंढे (१५, रा. खैरगाव, ता. नरखेड) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. या दोघीही खैरगाव येथील वसंतराव देशमुख विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी आहेत. त्या रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे मोवाड येथे सायकलने शिकवणी वर्गाला जात होत्या. मोवाडनजीकच्या रेल्वे फाटकाजवळ पावसाला सुरुवात झाल्याने दोघीही रोडच्या कडेला असलेल्या झाडाच्या आडोशाला उभ्या राहिल्या. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झाडावर कोसळली. त्यात उषाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर धनश्री गंभीर जखमी झाली. तिच्यावर मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)वलनी शिवारात एक ठारखापरखेडा : वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा नजीकच्या वलनी-चनकापूर शिवारात रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. सलामत उल्ला सेठ (६३) असे मृताचे नाव आहे. खापरखेडा परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या सलामत उल्ला सेठ यांनी वलनी-चनकापूर शिवारातील एका चिंचेच्या झाडाखाली आश्रय घेतला होता.
वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Published: May 09, 2016 2:58 AM