लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी गुरुवारी कळमना मार्केट परिसरात होत आहे. मतमोजणी प्रक्रि येसाठी शहर काँग्रेसने प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. मतमोजणी करण्यापूर्वी सर्वबाजूंनी ईव्हीएम तपासण्याची दक्षता घ्या, अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता मतमोजणी प्रसंगी सतर्क राहण्याचा इशारा काँग्रेसने पक्षाच्या प्रतिनिधींना दिल्या.मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी कमला नेहरू महाविद्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, शेख हुसैन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी १९ फेरीत होणार आहे. प्रत्येक फेरीच्या मतमोजणीला सुरुवात करण्यापूर्वी मतदान केंद्रावरील प्रतिनिधींनी ईव्हीएमची तपासणी करावी. सील तुटलेले नाही याची खात्री क रून घ्यावी. प्रत्येक फेरीत उमेदवारांना मिळणारी मते दिलेल्या तक्त्यात नोंद करावी. मतमोजणी केंद्रावर नियुक्त पदाधिकाºयांनी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत आपला टेबल सोडू नये. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार आहे. या केंद्रावरील ईव्हीएम मधील उमेदवार निहाय मिळालेली मते व व्हीव्हीपॅट मधील जुळतात की नाही याची पडताळणी करताना विशेष दक्षता बाळगण्याची सूचना विकास ठाकरे व नाना पटोले यांनी कार्यक र्त्यांना केल्या. मतमोजणी केंद्रावर पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कार्यक र्त्यांना नोंदीसाठी चार्ट देण्यात आले. ईव्हीएम संदर्भात शंका आल्यास संबंधित अधिकाºयांकडे याची तक्रार करा, मतमोजणीच्या वेळी गाफील राहू नका. असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी अशोक निखाडे,अॅड.अक्षय समर्थ, दिनेश तराळे, अॅड. अभय रणदिवे,आजीष वाजुरकर, गोपाल पटटम, राजेश काबळे,प्रशांत पाटील,डॉ.प्रकाश ढगे, मोतीराम मोहाडीकर,विश्वेश्वर अहिरकर,राजेश ढेगे,आशा उईके,शंकर देवगडे,धरम पाटील,संजय कडू,मनोज सांदेकर,रवी गाडगे, श्रीकांत ढोलके, प्रवीण गवरे, संजय झाडे,नरेश खडसे,राजू वानखेडे,सुनील गुलगुलवार,अमित पाठक,इप्तेखार अन्सारी,पुरुषोत्तम लोणारे,आकाश कथलकर, देवेद्र रोटोले,अजय नासरे,वैभव काळे, डॉ.अनिल वाघ, पंकज पांडे,जॉन थॉमस, पंकज लोणारे,राजेश कांबळे,गजेद्र भिसीकर, आनंद वैरागडे,सचिन डोंगरे,अनिल सोनकुसरे,परिक्षीत छुटके,सतिष तारेकर,श्याम सोनेकर,राजु पारोचे,प्रा.अनिल शर्मा, राजु वानखेडे,रसिक राणेकर,नितीन देशमुख,उमेश सोनकुसरे,पंकज निघोट,सुनिता शेंडे,नितीन गवरे आदी उपस्थित होेते.
काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:31 PM
नागपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी गुरुवारी कळमना मार्केट परिसरात होत आहे. मतमोजणी प्रक्रि येसाठी शहर काँग्रेसने प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. मतमोजणी करण्यापूर्वी सर्वबाजूंनी ईव्हीएम तपासण्याची दक्षता घ्या, अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता मतमोजणी प्रसंगी सतर्क राहण्याचा इशारा काँग्रेसने पक्षाच्या प्रतिनिधींना दिल्या.
ठळक मुद्देमतमोजणीसाठी प्रतिनिधी नियुक्त : मोजणीपूर्वी ईव्हीएमची तपासणी करण्याची सूचना