लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फसवणूक व ठार मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात आरोपी असणारे महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय तुळशीराम डांगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दोन कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. या रकमेचा डीडी येत्या शुक्रवारपर्यंत जमा करेल असे त्यांनी सोमवारी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली.गेल्या तारखेला न्यायालयाने अटकपूर्व जामीन हवा असेल तर, आधी दोन कोटी रुपये जमा करा असा आदेश डांगरे यांना देऊन यावर म्हणणे मांडण्यास सांगितले होते. डांगरे यांनी आरक्षित जमिनीवरील प्लॉट्स विकून ग्राहकांची सुमारे सव्वादोन कोटी रुपयांनी फसवणूक केली. हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. त्याची माहिती मिळविण्यासाठी प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे. त्याकरिता डांगरे यांना अटक करणे आवश्यक आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. गत १० जानेवारी रोजी सक्करदरा पोलिसांनी नवीन शुक्रवारी येथील रामूजी बाबुराव वानखेडे (६६) यांच्या तक्रारीवरून डांगरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ५०४ व ५०६-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तक्रारीतील माहितीनुसार, डांगरे यांनी सरकारी जमीन स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगून ती वानखेडे यांच्यासह अनेकांना विकली व त्यांच्याकडून वेळोवेळी ५५ लाख २५ हजार रुपये स्वीकारले. जमीन सरकारी असल्याची माहिती झाल्यानंतर वानखेडे यांनी डांगरे यांना पैसे परत मागितले होते. परंतु, डांगरे यांनी त्यांना सहकार्य केले नाही. उलट, त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी डांगरे यांनी सुरुवातीला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डांगरे यांच्यातर्फे अॅड. अक्षय नाईक तर, सरकारतर्फे अॅड. विशाल गणगणे यांनी कामकाज पाहिले.
दोन कोटी जमा करण्याची विजय डांगरे यांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 9:55 PM
फसवणूक व ठार मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात आरोपी असणारे महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय तुळशीराम डांगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दोन कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. या रकमेचा डीडी येत्या शुक्रवारपर्यंत जमा करेल असे त्यांनी सोमवारी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली.
ठळक मुद्देहायकोर्ट : जामिनावर शुक्रवारी पुढील सुनावणी