शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

विजय दर्डा यांनी केली होती नाणार विदर्भात आणण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 9:02 PM

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुचविले होते की, नाणार येथील लोक रिफायनरीला विरोध करीत आहेत, तर तो प्रकल्प विदर्भात लावता येऊ शकतो. आपल्या सूचनेच्या समर्थनार्थ दर्डा यांनी असे केल्यास होणारे फायदेही सांगितले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुचविले होते की, नाणार येथील लोक रिफायनरीला विरोध करीत आहेत, तर तो प्रकल्प विदर्भात लावता येऊ शकतो. आपल्या सूचनेच्या समर्थनार्थ दर्डा यांनी असे केल्यास होणारे फायदेही सांगितले होते.

  •  रिफायनरीमुळे ३० हजार लोकांना प्रत्यक्ष आणि एक लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.
  •  कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी दर्डा यांनी सुचविले होते की, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या समानांतर पाईपलाईन टाकून प्रतिवर्ष ४८ हजार कोटी रुपयाची बचत केली जाऊ शकते. जे विदर्भातील पेट्रोलियम उत्पादनाच्या वाहतुकीवर खर्च होतात.
  •  पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि एटीएफसारखे पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन विदर्भात स्वस्त होईल आणि ते विदर्भात औद्योगिक गुंतवणुकीलाही प्रोत्साहित करेल. विशेषत: मिहान-सेझ प्रकल्पाला विशेष प्रोत्साहन मिळेल.
  •  विदर्भातील रिफायनरीला रायपूर, जबलपूर आणि नागपूरच्या विमानतळाशी पाईपलाईनने जोडून माफक दरात एटीएफचा पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे विमान वाहतूक उद्योग आणि पर्यटन व्यवसायाला गती मिळेल.
  •  दर्डा यांनी असेही सुचविले होते की, जर नाणार रिफायनरीला काही कारणास्तव विदर्भात आणणे शक्य झाले नाही तर विदर्भ परिसरात एक नवीन ग्रीनफिल्ड रिफायनरी स्थापित केली जावी.
  •  आपल्या दाव्याचे समर्थन करताना दर्डा यांनी याकडे लक्ष वेधले होते की, भारतात कच्च्या तेलाचे शुद्धीकरण (रिफाईन)करण्याची सध्याची क्षमता २४० मिलियन टन इतकी आहे. ती २०३० पर्यंत ४४० मिलियन टनापर्यंत पोहोचवावी लागेल. त्यामुळे नवीन रिफायनरींची गरज पडणार आहे आणि त्यापैकी एक विदर्भात स्थापित केली जावी.

दर्डा यांच्या पत्राच्या सुमारे १८ दिवसांनतर शिवसेनेने नाणार रिफायनरीला विरोध सुरू केला. २३ एप्रिल रोजी शिवसेनेचे कार्यकरी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दर्डा यांच्या विचारांचे समर्थन करीत नाणार रिफायनरीला विदर्भात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

 

 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प