इतिहासापासून वर्तमानापर्यंत बालकांची अवस्था जैसे थेनागपूर : बालकांच्या दुर्दशेवर प्रदीर्घ कालावधीपासून लेखन करण्यात येत आहे. जुन्या काळापासून आजपर्यंत देशाच्या अनेक शहरांत बालकांची मोठी दुर्दशा होत असल्याचे दिसते. बालकांची दुर्दशा एक संवेदनशील विषय आहे. ज्यावर एखादा संवेदनशील व्यक्तीच लिखाण करू शकतो. बालकांच्या दुर्दशेवर अनेक कथा लिहिण्यात आल्या, परंतु शासनाची उदासीनता हीच बालकांच्या दुर्दशेला कारणीभूत आहे. बालकांची स्थिती सुधारण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. यामुळेच आजही गरीब बालकांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे, असे प्रतिपादन लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत गुरुवारी शिक्षक रवि रमाशंकर शुक्ल यांचा कथासंग्रह ‘कुडेदान मे बचपन’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. वीणा दाढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीतील ज्येष्ठ साहित्यिक विनोद बब्बर, दिल्ली पब्लिक स्कूलचे संचालक गौतम राजगढिया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. मनोज पांडेय उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज पांडेय यांनी केले. यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणात रवि शुक्ल यांच्या विषयाची आणि संवेदनशीलतेने केलेल्या लेखनाची स्तुती केली. संचालन क्षमाशंकर तिवारी यांनी केले. आभार नेहा हुड यांनी मानले. यावेळी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विजय दर्डा : ‘कुडेदान मे बचपन’चे प्रकाशन
By admin | Published: October 28, 2016 2:51 AM