शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

डिजिटल प्लॅटफॉर्मवर गीतकाराच्या रूपात विजय दर्डा यांचे पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 6:13 AM

‘तेरी महफिल से उठकर’ या नज्मला सात डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये - यू-ट्युब, विंक म्युझिक, अमेजन म्युझिक, आय-ट्युन्स, जिओ-सावन, अ‍ॅप्पल म्युझिक व साउंड क्लाउड यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांचे आता एक नवीन रूप जनतेसमोर येणार आहे. ‘तेरी महफिल से उठकर....’ या रुहानी नज्मच्या माध्यमातून ते गीतकार म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत.

 त्यांनी रचलेल्या गझलेला जयपूर घराण्याचे विश्वप्रसिद्ध गायक उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद मोहम्मद हुसेन यांनी स्वरांमध्ये गुंफले आहे व त्याचा स्वरसाजही हुसेन बंधूंनीच चढवला आहे. ‘वीर जारा’ या चित्रपटात त्यांनी गायलेली ‘आया तेरे दर पर दीवाना’ ही कव्वाली आजही संगीतप्रेमींच्या हृदयात साठवलेली आहे. रेड रिबन एंटरटेन्मेंट या प्रसिद्ध म्युझिक कंपनीने या अल्बमला डिजिटल प्लॅटफार्मवर सादर केले आहे. उल्लेखनीय म्हणजे रेड रिबन अनेक भाषांमधील चित्रपट संगीत, भक्तिगीत, फ्युजन, सुफी, गझल, शास्त्रीय व क्षेत्रीय संगीताची निर्मिती, वितरण आणि विपणन क्षेत्रात अग्रणी आहे.

‘तेरी महफिल से उठकर’ या नज्मला सात डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये - यू-ट्युब, विंक म्युझिक, अमेजन म्युझिक, आय-ट्युन्स, जिओ-सावन, अ‍ॅप्पल म्युझिक व साउंड क्लाउड यांचा समावेश आहे. याला संगीतप्रेमींकडूनही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. विजय दर्डा यांनी सांगितले, त्यांनी या नज्मच्या सुरुवातीच्या ओळी काही वर्षांपूर्वी लिहिल्या होत्या. या ओळी त्यांनी प्रसिद्ध गीतकार नीरज यांनाही ऐकविल्या होत्या. त्या ऐकून नीरज यांनी ‘हकीकत’ चित्रपटातील कैफी आझमी यांनी रचलेल्या एका गाण्यातील ‘मैं यह सोचकर उसके दर से उठा था’ या ओळी त्यांना ऐकविल्या. विजय दर्डा यांनी त्यांच्या नज्मचे उरलेले शेर गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात पूर्ण केले. 

ही नज्म रचण्यामागे प्रेरणा आहे ती, त्यांनी धर्मपत्नी ज्योत्स्ना दर्डा यांच्यासवे घालविलेल्या स्मरणीय क्षणांची आणि सोबतच त्या गेल्यानंतर होत असलेल्या विरहाच्या वेदनाही त्यात स्पष्ट जाणवतात. हुसैन बंधूंनी त्यांच्या अजोड गायन आणि नायाब संगीताने या रचनांना अत्यंत आनंददायी बनविले आहे. विजय दर्डा त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासूनच कविता, गझल, नज्म लिहीत राहिले आहेत. त्यांच्या अनेक रचना ‘स्क्रीनराइटर्स असोसिएशन’च्या साइटवर उपलब्ध आहेत. हे फिल्म, टीव्ही, ऑडियो आदींमध्ये लेखन करणाऱ्या गीतकारांचे संघटन आहे.