नागपूर : गृह विभागातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी निघाले. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे बदली झाली असून, त्यांच्या रिक्त जागेवर मुंबईहून विजय मगर येत आहेत, तर रश्मी नांदेडकर राज्य गुप्त वार्ता विभागात नागपूरच्या उपायुक्त झाल्या आहेत. यासोबतच नागपूरसह विदर्भातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गुरुवारी निघालेल्या वेगवेगळ्या चार आदेशांमध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त संवर्गातील ५४ अधिकारी, पोलीस उपअधीक्षक व सहायक पोलीस आयुक्त पदावरील ९२ अधिकारी, पदोन्नतीने पदस्थापना ६ अधिकारी आणि प्रशासकीय कारणावरून बदल्या झालेले ३१ अधिकारी यांचा समावेश आहे.
प्रशासकीय बदल्यांमध्ये नागपूरच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू समादेशक पदावर राज्य राखीव पोलीस बल दौंड, पुणे येथे जात आहेत. पोलीस उपायुक्त निलोत्पल हे मुंबईला पोलीस उपआयुक्त म्हणून जात आहेत. गडचिरोलीहून मनीषा कलवानिया पोलीस उपआयुक्त पदावर नागपूरला येत आहेत. औरंगाबाद येथे दहशतवाद विरोधी पथकाचे एसपी असलेले अविनाश बरगल आता अमरावतीचे एसपी म्हणून येत आहेत. या सोबतच डॉ. हरी बालाजी एन. (अमरावतीहून मुंबईला पोलीस उपआयुक्त), श्रीकांत परोपकारी (मुंबईहून प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूरला), तर चिन्मय पंडित धुळेवरून नागपूर पोलीस उपयुक्त म्हणून येत आहेत.
....
पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त संवर्ग
पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त संवर्गात ५४ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. विदर्भातील बदल्यांमध्ये पराग मणेरे (मुंबईहून अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर), शशीकांत सातव (अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण), एम. एम. मकानदार (मुंबईहून पोलीस उपआयुक्त, अमरावती शहर), श्याम घुगे (अमरावती ग्रामीणहून पोलीस उपआयुक्त, मुंबई), अनिता पाटील (नागपूर राज्य गुप्तवार्तामधून पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), विवेक मासाळ (समादेशक, राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. १३ नागपूर), हेमराज राजपूत (खामगावहून पोलीस उपआयुक्त, मुंबई शहर), चेतना तिडके (पोलीस उपआयुक्त, नागपूर शहर), विजय चव्हाण (वाशिमहून समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, सोलापूर)
...
पोलीस उपअधीक्षक व सहायक पोलीस आयुक्त
या संवर्गात ९२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. शिलवंत नांदेडकर (ढवळे) (औरंगाबाद), प्रशांत स्वामी (रायगड), नीलेश पांडे (मोर्शी), जालिंदर नालकूल (बार्शी, सोलापूर), शेखर देशमुख (चंद्रपूर), रमेश बरकते (उमरगा), नयन आलूरकर (रामटेक), पूनम पाटील (अमरावती), माधुरी बाविस्कर (नागपूर), सुधीर नंदनवार (चंद्रपूर), केशव शेंगळे (बृहन्मुंबई), राजेंद्र चव्हाण (रामटेक), कविता फडतरे (नाशिक ग्रामीण), जगदीश पांडे (कारंजा), परशुराम कार्यकर्ते (पुणे), व्यंकटेश देशपांडे (पुणे शहर), रेखा भवरे (बृहन्मुंबई), कुणाल सोनवणे (फैजापूर), अमोल भारती (सोलापूर ग्रामीण), राहुल गायकवाड (नवी मुंबई), जयदत्त भवर (औरंगाबाद ग्रामीण), भाऊसाहेब ढोले (हवेली), संकेत गोसावी (करवीर), सुदर्शन पाटील (खेड), सचिन कदम (बुलडाणा),
....
(जोड आहे...)