लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंबळच्या खोºयात डाकूंची (दरोडेखोरांची) दाणादाण उडवून देणारे विजयेंद्र बिद्री यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) च्या नागपूर युनिटचे अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे. बिद्री हे तामिळनाडू कॅडरचे आयपीएस अधिकारी असून प्रतिनियुक्तीवर त्यांना नागपुरात नियुक्त करण्यात आले आहे.२००५ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले विजयेंद्र बिद्री यांची राजस्थान कॅडर साठी निवड झाली होती. मात्र, लग्नानंतर त्यांनी केलेल्या विनंतीला मंजुरी देत त्यांना तामिळनाडू कॅडरमध्ये स्थानांतरित करण्यात आले, हे विशेष!सर्वप्रथम त्यांना राजस्थानातील दऊसा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी राजस्थानमध्ये गुजर आंदोलनाने तीव्र रूप घेतले होते. बिद्री यांनी प्रसंगावधान राखत येथील परिस्थिती हाताळली. त्यानंतर स्पेशल आॅपरेशन ग्रुपचे अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी या पदावर असताना अमली पदार्थाचा देशातील सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळवले. त्यांची कार्यशैली बघून त्यांना चंबळच्या खोºयात नियुक्त करण्यात आले. त्यांनी अनेक कुख्यात डाकूंचे एन्काऊंटर करून चंबळमध्ये डाकंूची दाणादाण उडवून दिली. त्यांच्याच कार्यकाळात अनेक कुख्यात डाकूंनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. त्यांच्या लग्नानंतर त्यांचे स्थानांतरण राजस्थानमधून तामिळनाडून कॅडरमध्ये करण्यात आले. चेन्नईत त्यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे.संपूर्ण कुटुंबीय उच्चपदस्थबिद्री यांची आई डॉक्टर असून वडील शंकर बिद्री निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. शंकर बिद्री १९७८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी बंगळुरु येथील पोलीस आयुक्त पदानंतर कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. विजयेंद्र बिद्री यांची बहीण विजयालक्ष्मी यांनी यूपीएससीच्या २००१ या परीक्षेत देशात अव्वलस्थान मिळवले होते. विजयेंद्र यांची पत्नी रोहिणी भाजीभाकरे या सोलापूर (महाराष्टÑ) येथील मूळ निवासी आहेत.