नागपूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिलेला पदाचा राजीनामा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी फेटाळला आहे. मंगळवारी चव्हाण यांनी विकास ठाकरे यांना राजीनामा मान्य नसल्याची महिती दिली. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांची बुधवारी देवडिया काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करून, महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, विकास ठाकरे यांनीही अशोक चव्हाण यांनी राजीनामा फेटाळल्याला दुजोरा दिला आहे.(प्रतिनिधी) शहर काँग्रेसचाही ठराव निवडणुकीतील पराभवाला विकास ठाकरे जबाबदार नाहीत. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा ठराव सर्व संमतीने पारित करण्यात आला. बैठकीला शहर कार्यकारिणीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. यात पदाधिकारी डॉ. गजराज हटेवार, निर्मला बोरकर, जयंत लुटे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अॅड. अक्षय समर्थ, अण्णाजी राऊ त, राजू व्यास, कृष्णा गोटाफोडे, रत्नाकर जयपूरकर, विजय इंगोले, इफ्तेखार अन्सारी, इरशाद मलिक, शिवनाथ शेंडे, रितेश बोरकर, हरीश खंडाईत, भास्कर चाफले, सदन यादव, चंदू वाकोडकर, शत्रुघ्न महतो, राजेश कुंभलकर, वंदना रोटकर, आप्पासाहेब मोहिते, अशोक वानखेडे, अनिता ठेंगरे, अर्चना बडोले, आशिष वारजूरकर, लोकेश बरडिया, रिंकू जैन, राजाभाऊ चिलाटे, विजय कदम, राम गोविंद, राजेश कडू, प्रभाकर खापरे आदी उपस्थित होते.
विकास ठाकरे यांचा राजीनामा फेटाळला
By admin | Published: March 01, 2017 2:18 AM