शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

विकास ठाकरेंनी मांडला कामाचा अन् बंडखोरांचा लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:52 PM

काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह समर्थकांनी मंगळवारी दिल्ली येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कमलनाथ, ए.के. अ‍ॅन्थोनी, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी शहर काँग्रेसने चार वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तसेच चतुर्वेदी यांच्यासह समर्थकांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांचा अहवालही सादर केला.

ठळक मुद्देअहमद पटेल, कमलनाथ, ए.के. अ‍ॅन्थोनी, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण यांची घेतली भेटगटबाजी करणाऱ्यांना तंबी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह समर्थकांनी मंगळवारी दिल्ली येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कमलनाथ, ए.के. अ‍ॅन्थोनी, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी शहर काँग्रेसने चार वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तसेच चतुर्वेदी यांच्यासह समर्थकांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांचा अहवालही सादर केला.ठाकरे यांच्यासोबत विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन, माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, माजी महापौर नरेश गावंडे, प्रशांत धवड, माजी उपमहापौर अण्णाजी राऊत, नगरसेवक संदीप सहारे, हरीश ग्वालबंसी, रमेश पुणेकर, नितीश ग्वालबंसी, विवेक निकोसे, आसीफ शेख, देवा उसरे, मनोज सांगोळे, पंकज लोणारे, अशरफ खान, इरफान कोमर, राजेश कुंभलकर, रवी घाडगे, गजराज हटेवार, जयंत लुटे, दीपक वानखेडे, राजू कमनानी, प्रमोद ठाकूर, प्रवीण गवरे, प्रवीण सांदेकर, शेख हुसैन, रमण पैगवार, नितीन साठवणे, इर्शाद अली, वासुदेव ढोके, प्रशांत पाटील, किशोर उमाठे, प्रसन्ना जिचकार यांनी नेत्यांची भेट घेतली.या भेटीत ठाकरे यांनी नेत्यांना सांगितले की,राज्यात, नागपुरात भाजपाची सत्ता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे भाजपा नेते आहेत. असे असतानाही गेली चार वर्षे आपण काँग्रेस जिवंंत ठेवली. दुसऱ्या  फळीतील हेच कार्यकर्ते पक्षासाठी झटले. या काळात तीन मोठ्या सभा, विधानभवनावर दोन मोर्चे काढण्यात आले. ३० आंदोलने केली. आपल्यावर २४ गुन्हे दाखल झाले तर दुसरीकडे पक्षाची पदे व सत्ता भोगलेल्या काही नेत्यांनी चार वर्षात भाजपाच्या विरोधात एक शब्दही काढलेला नाही. त्यांनी पडद्यामागून भाजपा नेत्यांशी हातमिळवणी करून काँग्रेस दुबळी करण्याची सुपारी घेतली आहे. याचे पुरावेही ठाकरे यांनी सादर केले.ज्येष्ठ नेत्यांनी नागपूरचे दौरे करावे. येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना बळ द्यावे व नागपुरात काँग्रेस मजबूत करण्यासाठी मदत करावी, अशी विनंतीही नेत्यांना करण्यात आली. चतुर्वेदी यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. यामुळे गटबाजी करणाऱ्यांना चाप बसला आहे, असे सांगत यानंतरही पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने केली. पक्षविरोधी काम करणाऱ्या  कुठल्याही नेत्याला मदत केली जाणार नाही. भाजपाशी साटेलोटे असणाऱ्यांना पक्षात स्थान दिले जाणार नाही, असे नेत्यांनी आश्वस्त केल्याचे विकास ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेcongressकाँग्रेस