शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

ड्रॅगन पॅलेस परिसरात विपश्यना केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:51 AM

ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठीची जागतिकस्तरावर ओळख झाली. आता ड्रॅगन पॅलेस परिसरात तब्बल १० एकर जागेमध्ये भव्य विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देमध्य भारतातील अप्रतिम शिल्पाकृती : राष्ट्रपतींच्या हस्ते २२ ला उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठीची जागतिकस्तरावर ओळख झाली. आता ड्रॅगन पॅलेस परिसरात तब्बल १० एकर जागेमध्ये भव्य विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे मध्य भारतातील अप्रतिम अशी शिल्पाकृती आहे. या भव्य वास्तूचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापक आणि राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी याबाबत गुरुवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणाºया या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. तर विशेष अतिथी म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव राहतील.प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले उपस्थित राहतील. मेडिटेशन सेंटरच्या उद्घाटनानंतर ड्रॅगन पॅलेसमध्ये विशेष बुद्धवंदना होईल.८३ फूट उंचीचा पॅगोडाया अप्रतिम विपश्यना मेडिटेशन सेंटरचा बांधकाम आराखडा महाराष्ट्र व गुजरात येथील शिल्पतज्ज्ञांनी तयार केला असून, यामध्ये गुजरातमधील प्रसिद्ध शिल्पतज्ज्ञ ठाकूरभाई पारेख यांचा समावेश आहे. स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून पी. टी. मसे असोसिएटस् यांनी काम केले आहे. पॅगोडाच्या सभोवताल उत्कृष्ट आकर्षक, कलात्मक शिल्पाकृती चेन्नई तामिळनाडू येथील ८० कुशल कारागिरांनी साकार केली आहे. तर इगतपुरी येथील १५० कुशल कारागिरांनी उत्कृष्ट बांधकाम केले आहे. भूपृष्ठापासून ८३ फूट उंचीचा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला असून, पॅगोडाच्या चारही बाजूला १० फूट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहेत. या पॅगोडाला देण्यात आलेला सोनेरी रंग हा थायलंडवरून मागवला आहे.१२५ साधक करू शकतील धम्मसाधनामेडिटेशन सेंटरच्या तळमजल्यावर ध्यानसाधनेकरिता २४ शून्यागार बांधण्यात आले आहेत. पहिल्या व दुसºया मजल्यावर तीन हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे वर्तुळाकार धम्मसभागृह तयार करण्यात आले आहे. यामध्ये १२५ साधक एकाच वेळेस सामूहिक धम्मसाधना करू शकतील. मेडिटेशन सेंटरमध्ये १२५ पुरुष व महिला साधकांकरिता स्वतंत्र व सुसज्ज सुविधायुक्त अशी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. २४०० चौरस फूट क्षेत्रफळामध्ये सामूहिक निवास व्यवस्थेकरिता डॉरमेंटरी हॉल बांधण्यात आले असून,भोजन व्यवस्थेकरिता १४०० चौरस फुटाचे दोन स्वतंत्र भोजनकक्ष बांधण्यात आले आहेत.