लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई-हावडा मेल नागपुर रेल्वेस्थानकावर आल्यावर एक विदेशी महिला गाडीखाली उतरली. ती दुसऱ्या प्लॅटफार्मवर गेल्यामुळे गाडी निघुन गेली. महिला रडु लागली. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने तिची सांत्वना करुन तिची पतीसोबत भेट करून दिल्याची घटना सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.सोमवारी सकाळी ११.२० वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२८०९ मुंबई-हावडा मेल नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीतून एक विदेशी महिला खाली उतरली. चुकीने ती दुसऱ्या प्लॅटफार्मवर गेली. तोपर्यंत गाडी पुढील प्रवासाला निघुन गेली होती. ती फक्त पर्शियन भाषा बोलु शकत असल्यामुळे ती आपली आपबिती कोणाला सांगु शकत नव्हती. ती रडत असल्याचे समजल्यानंतर स्टेशन उपव्यवस्थापक दत्तुजी गाडगे, राजु इंगळे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रविण रोकडे यांनी याबाबत आरपीएफला सुचना दिली. आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, निरीक्षक विरेंद्र वानखेडे यांनी उपनिरीक्षक होती लाल मिना, सहायक उपनिरीक्षक अभय बेदरकर यांना उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात पाठविले. तेथे त्या महिलेला फक्त पर्शियन भाषा येत असल्याचे समजले. त्यामुळे मीना यांनी मोबाईलवर ट्रान्सलेटर अॅप डाऊनलोड करून महिलेशी संवाद साधला. त्यानंतर तिने आपबिती सांगितली. तिची हकीकत जाणून घेतल्यानंतर आरपीएफने नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रेल्वेगाडीतील सीटीआय हरिक्रिष्णन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी महिलेच्या एस २ कोचमध्ये बसलेल्या पतीला भंडारा स्थानकावर उतरविले. तिचा पती तहेरियान मिर्झा बेकी (४७) हा नागपुरात आल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यानंतर पती-पत्नीने आरपीएफचे आभार मानुन आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली.
इराणच्या महिलेची घडविली पतीसोबत भेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 8:37 PM
मुंबई-हावडा मेल नागपुर रेल्वेस्थानकावर आल्यावर एक विदेशी महिला गाडीखाली उतरली. ती दुसऱ्या प्लॅटफार्मवर गेल्यामुळे गाडी निघुन गेली. महिला रडु लागली. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने तिची सांत्वना करुन तिची पतीसोबत भेट करून दिल्याची घटना सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.
ठळक मुद्देआरपीएफची कामगिरी : मुंबई-हावडा मेलमधुन झाली होती ताटातुट