लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राला अनोखी उंची प्रदान करणारे सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या नावावर असलेल्या ‘व्हीएनआयटी’चा (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरला. अभियंता दिनीच झालेल्या या समारंभात ब्रिटिशकालीन परंपरा हद्दपार करण्यात आली. ‘कॅप’ व ‘गाऊन’विना हा सोहळा पार पडला व विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीदेखील याचे स्वागत केले. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले ‘एनआयटी’ ठरले आहे.‘व्हीएनआयटी’ची स्थापना १९६० साली झाली व त्यावेळी संस्थेचे नाव ‘व्हीआरसीई’ होते. २००२ साली संस्थेला ‘एनआयटी’चा दर्जा देण्यात आला. सद्यस्थितीत ‘एनआयआरएफ’नुसार ‘व्हीएनआयटी’चा देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये ३१ वा क्रमांक आहे. ‘ड्रेसकोड’बाबत सुमारे ६०० विद्यार्थ्यांना वैयक्तिकपणे विचारणा करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ब्रिटिशकालीन ‘ड्रेसकोड’ नको, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर वरील प्रस्ताव ‘व्हीएनआयटी’च्या विधीसभेसमोर मांडण्यात आला. विधीसभेच्या मंजुरीनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. शनिवारी झालेल्या ‘व्हीएनआयटी’च्या दीक्षांत समारंभाला ‘टाटा केमिकल्स’चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ आर.मुकुंदन, प्रशासकीय परिषदेचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ.प्रमोद पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण समारंभात कुठेही ‘कॅप’ व ‘गाऊन’चा वापर दिसून आला नाही. सर्व विद्यार्थी पांढरा शर्ट व काळी पॅन्ट किंवा पांढरा सलवार-साडी या पोशाखात आले होते.
‘व्हीएनआयटी’चा दीक्षांत समारंभ ठरला ऐतिहासिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:10 PM
देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राला अनोखी उंची प्रदान करणारे सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या नावावर असलेल्या ‘व्हीएनआयटी’चा (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरला. अभियंता दिनीच झालेल्या या समारंभात ब्रिटिशकालीन परंपरा हद्दपार करण्यात आली. ‘कॅप’ व ‘गाऊन’विना हा सोहळा पार पडला व विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीदेखील याचे स्वागत केले. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले ‘एनआयटी’ ठरले आहे.
ठळक मुद्दे‘कॅप’ व ‘गाऊन’विना झाला सोहळा : ब्रिटिशकालीन परंपरा हद्दपार