लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरातून समर्थन मिळत आहे. सोमवारी नागपुरातही शेतकरीआंदोलनाच्या समर्थनार्थ विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन संविधान चौकात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला.
शेतकऱ्यांच्या संदर्भात संसदेने पारित केलेल्या तीन कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या १८ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. यात लाखो शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला देशभरातही पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांनी आज सोमवारी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवााहनाला नागपुरातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. संसदेने पारित केलेले तिन्ही कायदे शेतकरीविराेधी असून ते रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या अंतर्गत सोमवारी दुपारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आपचे जगजितसिंह, जनता दल सेक्युलरचे रमेश शर्मा, रिपाइंचे प्रकाश कुंभे, फाॅरवर्ड ब्लॉकचे यशवंत चितळे, आयटकचे शाम काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. रमेश पिसे, राहुल वानखेडे, राहुल दहीकर, टीयूसीसीचे मारुती वानखेडे, माकपचे अरुण वनकर, एसएससीईबी वर्कर्स फेडरेशनचे चंद्रशेखर मौर्य, एसयूसीआयचे माधव भोंडे, भारतीय महिला फेडरेशनच्या चंदा अपराजित, दिलीप तायडे, दक्षिणायनचे अमितााभ पावडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधाकर वाघुळे, महाराष्ट्र किसान सभेचे मधुकर मानकर, शिक्षण हक्क परिषदेच्या सुषमा रामटेके, आंगणवाडी युनियनच्या ज्योती अंडरसहारे, एआयएसएफचे आशीष बनकर, शेतमजूर युनियनचे मनोहर मुळे, सिटूचे मधुकर भरणे, ए.के. घोष, वि. रा. साथीदार, संजय हेडाऊ, मीना देशपाांडे, बंडू मेश्राम, राष्ट्र्रीय ओबीसी महासंघाच्या वंदना वनकर, रिपाइं सेक्युलरचे दिनेश अंडरसहारे यांच्यासह दिनेश गाेडघाटे, सुदर्शन मून, प्रवीण कांबळे आदींसह मोठ्या संख्येने विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.