लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. निवडणूक शांततेत पार पाडवी यासाठी कडेकोट बंदोबस्तही तैनातकरण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी याबाबत मंगळवारी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा प्रामुख्याने उपस्थित होते.मुदगल यांनी सांगितले की, नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघात तब्बल ४४२९ मतदान केंद्र आहेत. नागपुरात २०६५ मतदान केंद्र असून रामटेकमध्ये २३६४ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील एकूण ४० लाख ८१ हजार २७९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. संपूर्ण मतदान सुरळीत पार पडावे यासाठी २३ हजार कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रशिक्षण मिळाले असून उद्या पोलिंग पार्टी मतदान केंद्रासाठी रवाना होतील.पोलिंग पार्टी आज रवाना होणारमतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीला बुधवारी ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्याचे वितरण केले जाईल. विधानसभानिहाय करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम परिसरात साहित्याचे वितरण दिवसभर चालेल. सर्व पोलिंग पार्टी सायंकाळपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचतील. मतदानाची व्यवस्था करतील आणि तसा अहवाल सादर करतील.सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’मतदान केंद्रावर सकाळी ६ वाजता मॉक पोल घेण्यात येईल. यात सर्व उमेदवार व नोटांसह ५० मत टाकण्यात येतील. हे मॉक पोलिंग एजंटच्या उपस्थितीत होईल. यासाठी पोलिंग एजंटला कुठल्याही परिस्थितीत सकाळी ६.१५ वाजेपर्यंत मतदान केंद्रात पोहोचावे लागेल. ते न आल्यास मॉक पोल सुरू केले जाईल. ते ७ वाजेपर्यंत चालेल. ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल.मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंतमतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदान केंद्रात ६ वाजेपर्यंत रांगेत असणाऱ्या प्रत्येक मतदारांना मतदान केंद्रातील अधिकारी एक कूपन देईल. ज्यांच्याजवळ कूपन असेल त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहील.प्रत्येकी दोन ईव्हीएम मशीनएका बॅलेट मशीनवर १५ उमेदवार आणि एक नोटा असे १६ नावे येतात. नागपूरमध्ये एकूण ३० उमेदवार रिंगणात आहेत. तर रामटेकमध्ये १६ उमेदवार आहेत. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन ईव्हीएम मशीन लागणार आहे. रामटेकमध्ये केवळ नोटासाठी दुसरी स्वतंत्र ईव्हीएम मशीन लागेल. यंदा ईव्हीएमवर उमेदवारांचे फोटोही राहतील.ईव्हीएम मशीन बिघडल्यास अतिरिक्त व्यवस्थाईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये १३२ टक्के व्हीव्हीपॅट, १२५ टक्के कंट्रोल युनिट तर २४० टक्के बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर ऑफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.नागपूर लोकसभा मतदान केंद्रविधानसभा मतदान केंद्रनागपूर दक्षिण पश्चिम - ३७८नागपूर दक्षिण - ३४९नागपूर पूर्व - ३३६नागपूर मध्य - ३०५नागपूर पश्चिम - ३३२नागपूर उत्तर - ३६५---------------------एकूण - २०६५
नागपुरात गुरुवारी मतदान, प्रशासन सज्ज : २३ हजार कर्मचारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 9:55 PM
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. निवडणूक शांततेत पार पाडवी यासाठी कडेकोट बंदोबस्तही तैनातकरण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी याबाबत मंगळवारी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली.
ठळक मुद्दे४० लाख ८१ हजारावर मतदार बजावणार हक्क