शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

१०८६ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:09 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींमध्ये उद्या, शुक्रवारी (दि. १५) रोजी निवडणूक होणार आहे. एकूण १३० नियोजित ग्रामपंचायतींपैकी सोनपूर ...

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींमध्ये उद्या, शुक्रवारी (दि. १५) रोजी निवडणूक होणार आहे. एकूण १३० नियोजित ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (कळमेश्वर) व जटामखोरा (सावनेर) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतीची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतींमध्ये उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

१२७ ग्रामपंचायतींच्या ४३१ पैकी ४११ वॉर्डात ही निवडणूक होत आहे. येथे ११९६ जागांपैकी १०८६ जागांसाठी मतदान होईल. यासाठी ३०१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप समर्थीत पॅनल अशी लढत होत आहे.

निवडणुकीसाठी १३ तालुक्यात ४८५ मतदान केंद्रांवर १४५५ मतदान अधिकारी - कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मतदान केंद्रनिहाय ४८५ केंद्रप्रमुख व मतदान केंद्र अधिकारी यांचा समावेश आहे. या निवडणुकीची ११ डिसेंबर २०२० रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. १३ तालुक्यांमध्ये तहसीलदारांमार्फत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. काटोल तालुक्यात ३ ग्रामपंचायतींच्या ९ वॉर्डातील २३ जागांसाठी मतदान होईल. नरखेड तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या ५५ वॉर्डापैकी प्रत्यक्ष ५४ वॉर्डात १३३ जागांसाठी मतदान होईल. सावनेर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या ३८ वॉर्डातील ९६ जागांसाठी मतदान होईल. कळमेश्वर तालुक्यात ४ ग्रामपंचायतींच्या १३ वॉर्डातील ३७ जागांसाठी मतदान होईल. रामटेक तालुक्यात ९ ग्रामपंचायतींच्या ३२ वॉर्डातील ८२ जागांसाठी मतदान होईल. पारशिवनी तालुक्यात १० ग्रामपंचायतींच्या ३१ वॉर्डातील ८० जागांसाठी मतदान होईल. मौदा तालुक्यात ७ ग्रामपंचायतींच्या ३१ वॉर्डातील ५८ जागांसाठी मतदान होईल. कामठी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या ३१ वॉर्डातील ८५ जागांसाठी मतदान होईल. उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ४३ वॉर्डातील ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. भिवापूर तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या ९ वॉर्डामधील २७ जागांसाठी मतदान होईल. कुही तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या ७८ वॉर्डातील १८६ जागांसाठी मतदान होईल. नागपूर ग्रामीणमधील ११ ग्रामपंचायतींच्या ४७ वॉर्डातील १३२, तर हिंगणा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींच्या १७ वॉर्डातील ५९ जागांसाठी मतदान होईल.

--

मतदानासाठी आवश्यक साहित्यासह मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी गुरुवारी रवाना झाली आहे. निवडणूक होत असलेल्या १२७ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात कुठेही संवेदनशील केंद्र नाही. मतदारांनी कोविड नियमांचे पालन करीत मतदानाचा हक्क बजावावा.

- डॉ. शिवनंदा लंगडापुरे

उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा. पं. निवडणूक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षा उपायांचे पालन करून मतदान प्रक्रिया राबविली जाईल. तहसीलदार व तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेद्वारे मतदान केंद्रांवर कोरोना सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यात निवडणुका शांतपणे पार पाडव्यात, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात ४८५ मतदान केंद्रांवर १०० पोलीस अधिकारी, ६११ पोलीस कर्मचारी, २५० होम गार्ड तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच एसआरपीएफच्या दोन कंपन्या, शीर्घ कृती दल आणि दंगा नियंत्रण पथक सज्ज असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

सोमवारी मतमोजणी

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तालुकास्तरावरील स्ट्राँग रुममध्ये इव्हीएम सुरक्षित ठेवण्यात येईल. सोमवारी (दि. १८) तेराही तालुक्यात नियोजित केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी ४ वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे.