लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वानाडोंगरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह २१ नगरसेवकपदासाठी गुरुवारी (दि. १९) मतदान होत आहे. यासाठी ३५ बूथ सज्ज झाले आहे. वानाडोंगरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी (दि. २०) मतमोजणी होणार आहे.वानाडोंगरी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी निवडणूक होत आहे. त्यामुळे पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुकांनी दंड थोपटले. १० प्रभागातून २१ नगरसेवकपदासाठी तब्बल १०६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार नशीब अजमावत आहे. येथील मतदारसंख्या २८ हजार असून ३५ बूथ आहेत.गेल्या १५ दिवस निवडणूक प्रचाराने वातावरण तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली. अनेक दिग्गजांच्या सभा वानाडोंगरीत झाल्या. आरोपप्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या गेल्या. विशेष म्हणजे, प्रचारासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यात आला.
नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरीत आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:17 PM
वानाडोंगरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह २१ नगरसेवकपदासाठी गुरुवारी (दि. १९) मतदान होत आहे. यासाठी ३५ बूथ सज्ज झाले आहे. वानाडोंगरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी (दि. २०) मतमोजणी होणार आहे.
ठळक मुद्देनगराध्यक्ष व २१ नगरसेवकपदासाठी ३५ बूथ सज्ज