- शोभणे कार्याध्यक्ष, मानेकर सरचिटणिस
- कोलते व डोळके उपाध्यक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ साहित्य संघाची २०२१-२६ या काळातील नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या नेतृत्त्वात विलास मानेकर यांची सरचिटणीसपदी फेरनियुक्ती झाली आहे. कार्याध्यक्ष म्हणून डॉ. रवींद्र शोभणे यांची तर डॉ. रमाकांत कोलते व डॉ. राजेंद्र डोळके यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच विकास लिमये कोषाध्यक्ष, नितीन सहस्त्रबुद्धे कार्यालय चिटणीस, प्रदीप मुनशी अर्थ व सार्वजनिक न्यास चिटणीस, प्रदीप दाते शाखा समन्वय चिटणीस, प्रफुल्ल शिलेदार युगवाणीचे संपादक, भाग्यश्री बनहट्टी परीक्षा समिती संचालक, डॉ. विवेक अलोणी ग्रंथालय संचालक, उल्हास केळेकर सांस्कृतिक संकुल संचालक, डॉ. तीर्थराज कापगते साहित्य उपक्रम सदस्य, उदय पाटणकर सांस्कृतिक उपक्रम सदस्य, संयोगिता धनवटे शताब्दी समिती मार्गदर्शक अशी ही नियुक्ती आहे. यासोबतच शाखा समन्वय समिती सदस्य म्हणून डॉ. इंद्रजित ओरके, डॉ. सतीश तराळ, डॉ. रमेश जलतारे, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, डॉ. श्याम मोहरकर, डॉ. गजानन वाघ यांची तर नामित सदस्य म्हणून मनोज पाठक व रवी पिंपळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
साहित्य महामंडळावर मानेकर, दाते, नारे
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर अन्य प्रतिनिधी म्हणून विदर्भ साहित्य संघाकडून विलास मानेकर, प्रदीप दाते व डॉ. गजानन नारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संमेलनाच्या आमंत्रकपदाची जबाबदारी डॉ. रवींद्र शोभणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
------------
शताब्दी समितीची प्रक्रिया सुरू
वि.सा. संघाचे शताब्दी वर्ष पुढच्या वर्षापासून सुरू होत आहे. त्यातील सुकाणू समितीचे मार्गदर्शक म्हणून मनोहर म्हैसाळकर, डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. राजन जयस्वाल असतील तर सरचिटणीस विलास मानेकर व कोषाध्यक्ष विकास लिमये हे पदसिद्ध सदस्य असतील. समितीत प्रकाश एदलाबादकर, डॉ. विलास देशपांडे, शुभदा फडणवीस, नरेश सबजीवाले, डॉ. मोना चिमोटे, नरेंद्र लांजेवार, डॉ. अरुंधती वैद्य, सीमा रोठे असतील.
...............