शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

‘व्याघ्रमित्र’ करणार वाघ व जंगलाचे संवर्धन : पवनी वनपरिक्षेत्रात नेमणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:33 PM

जंगले, वाघ व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जंगलांना लागून असलेल्या गावागावात व्याघ्रमित्र तयार करण्याची संकल्पना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या संकल्पनेची पहिली सुरुवात पवनी वनपरिक्षेत्रातून करण्यात आली. वनविभागातर्फे या वनपरिक्षेत्रालगतच्या गावातील काही तरुणांची व्याघ्रमित्र म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे व्याघ्रमित्र आता वनकर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जंगलाच्या संवर्धनासाठी काम करणार आहेत.

ठळक मुद्देवनविभागाच्या संकल्पनेला पहिल्यांदा सुरुवात

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : जंगले, वाघ व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जंगलांना लागून असलेल्या गावागावात व्याघ्रमित्र तयार करण्याची संकल्पना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या संकल्पनेची पहिली सुरुवात पवनी वनपरिक्षेत्रातून करण्यात आली. वनविभागातर्फे या वनपरिक्षेत्रालगतच्या गावातील काही तरुणांची व्याघ्रमित्र म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे व्याघ्रमित्र आता वनकर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जंगलाच्या संवर्धनासाठी काम करणार आहेत.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी नागपूर वनविभागाच्या पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलालगतच्या गावातील काही तरुणांना व्याघ्रमित्र म्हणून नेमण्यात आले. हे तरुण गेल्या वर्षभरापासून वन कर्मचाऱ्यांसोबत व्याघ्र आणि जंगल संरक्षणासाठी अविरत काम करत आहेत. नागपूर स्थित हेरिटेज कंझर्व्हेशन सोसायटीच्या वन्यजीव संवर्धन विभागाच्या माध्यमातून या सगळ्यांना व्याघ्रमित्राचा गणवेशही देण्यात आला. वन कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे जवान आता एका विशिष्ट गणवेशात दिसतील. ही संकल्पना तशी जुनी आहे. वनसंवर्धनासाठी व्याघ्रमित्र तयार करायचे होते, मात्र अद्यापपर्यंत कुणी पुढाकार घेतला नव्हता. पहिल्यांदा नागपूर वनविभागातर्फे वाघांचे अस्तित्व असलेल्या वनपरिक्षेत्रात असे व्याघ्रमित्र नेमणे सुरू करण्यात आले. नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके आणि रितेश भोंगाडे या सगळ्यांच्या पुढाकाराने राज्यात पहिल्यांदा व्याघ्रमित्रांची संकल्पना अमलात आणण्यात आली आहे.वने व वन्यजीव संवर्धनात आपलाही सहभाग देण्यासाठी हेरिटेज कंझर्व्हेशन सोसायटीच्या लीना झिलपे यांनी व्याघ्रमित्रांना गणवेश देण्यासाठी पुढाकार घेतला. वने आणि वन्यजीव हेसुद्धा आपले हेरिटेज आहेत, त्यामुळे हेरिटेज सोसायटी व वन्यजीव संवर्धन विभाग सदैव तत्पर राहील असे मत संस्थेच्या लीना झिलपे यांनी व्यक्त केले. यापुढेही संस्था वन्यजीव आणि वनसंवर्धन व संरक्षणासाठी काम करीत राहील, असा विश्वास त्यांनी दिला.

टॅग्स :forestजंगलTigerवाघ