लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी येथील वयोवृद्ध चंपाती दाम्पत्याचा खुनात दत्तक मुलीच्या प्रियकराचीच मुख्य भूमिका असून, त्यानेच दत्तक मुलीला आई-वडिलांचा खून करण्यासाठी भडकविल्याचा पोलिसांना संशय आहे. या दुहेरी हत्याकांडाचा शोध लावण्यासाठी पोलीस आरोपींना विचारपूस करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.पोलिसांनी वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी शंकर चंपाती (७२) आणि त्यांची पत्नी सीमा (६४) यांच्या हत्येच्या आरोपात त्यांची अभियंता मुलगी ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका चंपाती आणि तिचा प्रियकर क्रि केट खेळाडू मोहम्मद इखलाक खान याला अटक केली आहे. दोघेही २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. प्रियंकाने वडिलांना टरबूजमध्ये झोपेची गोळी दिली होती. इखलाकने प्रियंकाच्या घरी जाऊन चाकूने गळा कापून आणि डोक्यावर वार करून दोघांची हत्या केली होती. आयटी इंजिनियर असलेल्या प्रियंकाने खून आणि प्रियकाराशी संबंधित सर्व पुरावे मिटविले होते. परंतु त्यामुळेच तिच्यावर पोलिसांना संशय आला होता.पोलिसांना संशय आहे की, या हत्याकांडात इखलाक याचीच मूख्य भूमिका आहे. त्यानेच प्रियंकाच्या मनात आई-वडिलांविरुद्ध असलेल्या रागाला अधिक भडकविले. त्याने प्रियंकाला इतके भडकविले की ती आपल्या आई-वडिलांचा खून करण्याचाही विचार करू लागली. इखलाक अनेक वर्षांपासून प्रियंकासोबत होता. बी.ई. करताच तिला आयटी कंपनीत नोकरी लागली होती. नोकरी लागताच ती उच्चभ्रू जीवन जगू लागली होती. तिच्या तुलनेच चंपाती दाम्पत्य अतिशय संयमित होते. ते खाण्यापिण्यावरही अधिक खर्च करीत नव्हते. प्रियंकालाही वारेमाप खर्च करण्याऐवजी त्यांना पैसे देण्यासाठी सांगत होते. त्यामुळेच त्यांचा प्रियंकाशी वाद होऊ लागला होता. ती आपले जेवणही वेगळे बनवू लागली होती. आपली कमाई ती स्वत:सह इखलाकवरही खर्च करीत होती. इखलाकने प्रियंकाला आपल्या जाळ्यात फसवून ठेवले होते. प्रियंका आई-वडिलांशी होणारे लहान-मोठे सर्व वाद त्याला सांगायची. तो तिला सांत्वना देण्याच्या बहाण्याने आई-वडिलांविरुद्ध आणखी भडकवायचा.अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. त्याच्या भडकविण्यामुळेच प्रियंकाने खुनाची योजना बनविली. इखलाकचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील आहे. त्याच्या कुटुंबातील पार्र्श्वभूमीचा पत्ता लावला जात आहे. इखलाकचे काही नातेवाईक येथेही राहतात. त्यांची माहितीही गोळा केली जात आहे. पोलिसांनी बुधवारी घटनास्थळाची पाहणी करून, पुन्हा काही पुरावे गोळा केले. हे हत्याकांड गुन्हे शाखेने उघडकीस आणले. त्याच्याशी संबंधित तपास वाडी पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. वाडी पोलीस घटनेची माहिती देण्यास मागे-पुढे पाहत आहे.लग्नासाठी घेतले दीड लाखइखलाक योजनाबद्ध पद्धतीने प्रियंकाचा खिसा खाली करीत होता. त्याने नोव्हेंबरमध्ये बहिणीच्या लग्नाच्या नावावर प्रियंकाकडून दीड लाख रुपये घेतले होते. प्रियंका आपल्या कमाईपैकी बहुतांश पैसे इखलाकवर खर्च करायची. इखलाकजवळ कमाईचे कुठलेही साधन नव्हते. क्रिकेटसाठी खर्च होणारी रक्कमसुद्धा तो कुटुंबीय किंवा प्रियंकाकडून घेत होता. त्याने बारावीनंतर शिक्षणही सोडले होते.
वाडी दुहेरी हत्याकांडात प्रियकरच मुख्य आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:52 PM
वाडी येथील वयोवृद्ध चंपाती दाम्पत्याचा खुनात दत्तक मुलीच्या प्रियकराचीच मुख्य भूमिका असून, त्यानेच दत्तक मुलीला आई-वडिलांचा खून करण्यासाठी भडकविल्याचा पोलिसांना संशय आहे. या दुहेरी हत्याकांडाचा शोध लावण्यासाठी पोलीस आरोपींना विचारपूस करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.
ठळक मुद्देसांत्वनेच्या बहाण्याने दत्तक मुलीला भडकविले : पोलिसांचा तपास सुरू