आशिष गाेडबाेले
लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : काेराेना संक्रमणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक अडचणींमध्ये माेठी भर पडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच आईवडिलांना मदत करण्यासाठी शाळकरी मुलांनी शेतात कामाला जायला सुरुवात केली आहे. सावनेर तालुक्यातील पिपळा (डाकबंगला) परिसरात इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थी शेतात कपाशीपासून तर विविध झाडांच्या लागवडीची कामे करताना दिसून येत आहेत.
काेराेना संक्रमणामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण ढवळून निघाले आहे. काही मुलांना त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीची जाणिव असल्याने त्यांनी स्वत:हून शेतात मजुरीने काम करण्याचा निर्णय घेतला. सहाव्या वर्गात असलेला अंशुल नरेंद्र गजभिये, दहाव्या वर्गातील आर्यन सोमकुवर, यश अनिल सोमकुवर, तिघेही रा. इसापूर, ता. सावनेर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी शेतीची कामे करायला सुरुवात केली आहे.
काेराेना काळात काम मिळेनासे झाल्याने बचत असलेल्या पैशावर काळ काढला. आता ही बचत संपत आल्याने जगण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पालनपाेषण व मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. इसापूर शिवारातील शेतात वडिलांसाेबत काम करणारा इयत्ता सहावीतील अंशुल गजभिये म्हणाला, काेराेनामुळे अडचणी वाढल्या आहेत. शाळा बंद असून, ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. माेबाईल खरेदी करायला वडिलांकडे पैसे नाही. त्यामुळे मी वडिलांना मदत करीत आहे. यातून मला थाेडेफार पैसे मिळतील व वडिलांना मदत हाेईल म्हणून मी स्वत:हून मजुरी करीत आहे, असेही अंशुलने सांगितले.
पिपळा (डाकबंगला) व इसापूर शिवारात कपाशीच्या लागवडीसाेबतच काही शेतकरी त्यांच्या शेतात शेवगा, रक्तचंदन, मिलिया डुबिया, यासह अन्य झाडांच्या राेपट्यांची लागवड करीत आहेत. या राेपट्यांच्या लागवडीतून या विद्यार्थ्यांना राेजगार मिळाला आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक मुलांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही.
...
शालेय साहित्यासाठी पैशाची जुळवाजुळव
आज ना उद्या शाळा सुरू हाेणार आहे. वडिलांकडे आम्हाला लागणारे शालेय साहित्य खरेदीसाठी पैसे नाही. त्यामुळे आपण शेतात काम करीत असून, मजुरीतून मिळणाऱ्या पैशातून पुस्तके, नाेटबुक, वह्या व इतर शालेय साहित्य खरेदी करणार असल्याचे अंशुल गजभिये, आर्यन सोमकुवर, यश अनिल सोमकुवर या विद्यार्थ्यांनी सांगितले. पैशाअभावी पेरणीसाठी मजूर सांगणे शक्य नसल्याने आपण पत्नी व मुलांकरवी पेरणी पूर्ण केली. यातून वाचलेली मजुरीची रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी कामी येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
===Photopath===
240621\1931-img-20210624-wa0021.jpg
===Caption===
सावनेर तालुक्यातील इसापूर शिवारात शेमजुरी करताना शाळकरी मुले