शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नागपुरात ‘ऑर्गन रिट्रायव्हल’ची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 10:53 AM

नागपुरात आठ महिने होऊनही ‘आर्गन रिट्रायव्हल’ म्हणजे मेंदुमृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया व त्याचवेळी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली नाही.

ठळक मुद्दे ‘ब्रेनडेड’ रुग्णाची नोंदच होत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गेल्या वर्षी एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दोन ‘ऑर्गन रिट्रायव्हल’ झाले. परंतु आता आठ महिने होऊनही ‘आर्गन रिट्रायव्हल’ म्हणजे मेंदुमृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया व त्याचवेळी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली नाही. विशेष म्हणजे, दोन्ही रुग्णालयात आठवड्यातून किमान एक तरी रुग्ण ‘ब्रेनडेड’ अवस्थेत येतो. परंतु नातेवाईकांचे समुपदेशन, तातडीच्या हालचालीकडे दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही रुग्णालयाला ‘रिट्रायव्हल’ची प्रतीक्षा आहे.मूत्रपिंड (किडनी), फफ्फुस, यकृत, स्वादुपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा हे मानवाच्या शरीरातील विविध अवयव दान करून एक ‘ब्रेन डेड’ (मेंदुमृत) व्यक्ती इतर १० व्यक्तींना नवा जन्म देऊ शकते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांसाठी सुरू झालेल्या मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मुळे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी या दोन्ही रुग्णालयांना ‘ब्रेन डेड’ रुग्णांकडून त्यांच्या नातेवाईकांच्या मंजुरीने अवयव काढण्याची म्हणजे, ‘नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रायेवल सेंटर’ ला (एनटीओआरसी) परवानगी नव्हती. दोन वर्षांपूर्वी मेडिकलला तर गेल्यावर्षी ‘मेयो’ला ‘एनटीओआरसी’ची मंजुरी मिळाली. ‘ह्युुमन ऑर्गन ट्रान्सप्लांट’ कायदा १९९४ नुसार प्रत्येक ब्रेन डेड व्यक्तीची माहिती ‘झेडटीसीसी’ला देणे बंधनकारक आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयामध्ये आवश्यक सोयी व विशेषज्ञ असताना ‘रिट्रायव्हल’ होत नसल्याचे वास्तव आहे.मेयोमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात जरीपटका येथील राम काकुमल खिलनानी (४६)या ब्रेनडेड व्यक्तीचे, तर मागील वर्षात मेडिकलमध्ये डिसेंबर महिन्यात पवन बाबुरावजी मते (३०) रा. धानला व निखील जगदीश सोनवणे (१८) रा. वडधामणा, हिंगणा या दोन्ही तरुणाचे ‘ऑगर्न रिट्रायव्हल’ करण्यात आले. परंतु या वर्षात आतापर्यंत एकही ‘ब्रेनडेड’ रुग्णाची नोंद झाली नाही, यामुळे ‘रिट्रायव्हल’ होऊ शकले नाही, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे अवयवदानाचा कायदा शासकीय रुग्णालयांसाठी तरी कठोर करावा, अशी मागणी अवयवदान चळवळीतील सदस्यांकडून होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य