शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

परीट समाजाला व्यवसायावरील ग्रहण सुटण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:23 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायासह परीट समाजाच्या व्यवसायावरही ग्रहण लागले आहे. अडीच महिन्यापासून काम बंद असून कुठलीही आवक नसल्याने कपडे धुण्याच्या कामावर अवलंबून असलेल्या या समाजाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे व्यवसायाला लागलेले हे ग्रहण कधी सुटेल, ही प्रतीक्षा असून शासनाने समाजाला मदत करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायासह परीट समाजाच्या व्यवसायावरही ग्रहण लागले आहे. अडीच महिन्यापासून काम बंद असून कुठलीही आवक नसल्याने कपडे धुण्याच्या कामावर अवलंबून असलेल्या या समाजाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे व्यवसायाला लागलेले हे ग्रहण कधी सुटेल, ही प्रतीक्षा असून शासनाने समाजाला मदत करण्याची मागणीही करण्यात आली आहे.बारा बलुतेदार संघटनेचे संजय भिलकर यांनी परीट समाजाच्या अवस्थेबाबत माहिती दिली. लॉकडाऊनपासून परीट समाजाचे काम बंद झाले आहे. उन्हाळा हा परीट व्यवसायासाठीही सीझनचा काळ असतो. लग्न समारंभासाठीे मंगल कार्यालयातील कपडे मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र समारंभावर बंदी असल्याने मंगल कार्यालयातील कपडे येणे बंद झाले. दुसरीकडे खासगी रुग्णालयातील कपडे येणेही बंद झाले. सामान्य नागरिकांचे कपडेही येणे थांबले. शासकीय रुग्णालयाचे कपडे येतात पण कंत्राटानुसार काही मर्यादित लोकांना काम मिळते. काही दिवसांपासून शासनाने टाळेबंदीत शिथिलता आणली आणि व्यवसाय सुरू केला, मात्र लोकही भीतीमुळे कपडे द्यायला नकार देत आहेत. त्यामुळे अडीच महिन्यापासून अडचणी कायम आहेत.नागपूर शहरात परीट समाजाची लोकसंख्या २५ हजाराच्या वर आहे. कर्नाटक सरकारने या व्यावसायिकांना प्रतिमाह ५००० रु. देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेहीे याच धर्तीवर परीट व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी संघटनेतर्फे संजय भिलकर यांनी केली. तसेच भाड्याच्या खोलीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने २० लाख कोटींची घोषणा केली, त्याचा लाभही परिटांना मिळाला नसल्याचे सांगत शासनाने समाजाची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

टॅग्स :communityसमाजnagpurनागपूर