शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

स्मार्ट आरसीची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:17 AM

राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना, वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) ....

ठळक मुद्देपेपर आरसीची कटकट थांबणार : तीन वर्षांनंतर सेवापुरवठादाराची नेमणूक

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना, वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात होते. मात्र आता हा प्रकार संपुष्टात येणार असून, साधारण १३ नोव्हेंबरपासून ‘आरसी’ला ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले जाणार आहे. याचे कंत्राट ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ या कंपनीला देण्यात आले आहे.परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बुक’ला २००६ मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. या ‘कार्ड’च्या पुरवठ्यासाठी ‘शाँग’ या खासगी कंपनीशी करार केला होता. जून २०१४ मध्ये कंपनीचे कंत्राट संपले. विभागाने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु यादरम्यान नव्या कंपनीला कंत्राट किंवा यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाºया वाहनांना जुन्या स्वरूपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. विशेष म्हणजे, आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी बुक कागदाचा (प्रीप्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने प्रलंबित आरसी बुकची समस्या वाढली होती. यातच आरसी बुक बाळगताना कागदापेक्षा स्मार्ट कार्ड सोईस्कर आणि कागदाच्या तुलनेत टिकाऊ असल्याने नागरिकांकडून कागदाच्या आरसी बुकबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन विभागाने पुन्हा ‘स्मार्ट आरसी बुक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी नागपूर विभागातून होत आहे. तशा सूचना परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दिल्या आहेत.शुल्क होणार कमीपरिवहन विभागाने ‘आरसी बुक’चे ‘स्मार्ट कार्ड’ बनविण्याचे काम ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ कंपनीला दिले असून, त्यासंबंधीचा करारही केला आहे. कंपनीला प्रति स्मार्ट कार्डमधून सुमारे ५४ रुपये ७२ पैसे मिळतील; शिवाय कंपनीला वाहन १.० प्रणालीमधून वाहन ४.० प्रणालीमध्ये डेटा रूपांतरित करावा लागणार आहे. पूर्वी या स्मार्ट कार्डचे ३९४ रुपये मोजावे लागायचे, आता साधारण २५० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.पेपर आरसीलाही मिळणार ‘स्मार्ट कार्ड’गेल्या तीन वर्षांपासून वाहनधारकांना ‘पेपर आरसी’ दिली जात आहे. मात्र, आता सेवापुरवठादार नेमण्यात आल्याने ज्यांच्याकडे पेपर आरसी आहे आणि त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ हवे असेल, तर त्यासाठीचा अर्ज व शुल्क ‘आरटीओ’कडे भरून त्यांना ते दिले जाणार आहे, अशी माहिती आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.कार्ड रीडरही येणारस्मार्ट कार्ड खिशात असले तरी त्याला लागली ‘चीप’ रीड करण्यासाठी ‘कार्ड रीडर’ नव्हते. परंतु आता पुरवठादार हे ‘कार्ड रीडर’ही आरटीओ कार्यालयांना उपलब्ध करून देणार आहे. तसे करारात नमूद आहे.