शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

वेकोलि महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार : ऊर्जामंत्र्यांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:00 PM

राज्यातील महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि परळी वीजनिर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असून वेस्टर्न कोल फिल्डस (वेकोलि) महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार असल्याची कबुली वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. याच बैठकीत कोळसा चोरीबाबत पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.

ठळक मुद्देराज्यातील वीज निर्मिती केंद्रांकडे पुरेसा कोळसा साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि परळी वीजनिर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असून वेस्टर्न कोल फिल्डस (वेकोलि) महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार असल्याची कबुली वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. याच बैठकीत कोळसा चोरीबाबत पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.या बैठकीला खनिज महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष जयस्वाल, वेकोलिचे प्रमुख अधिकारी, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक बुरडे व अन्य उपस्थित होते. मागील २०१४-१५ मध्ये महानिर्मितीला ३९ दशलक्ष टन कोळसा वेकोलिने पुरवला होता. यंदा ४१ दशलक्ष टन कोळसा पुरविण्यात आला असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हा कोळसा पुरवठा ५६ दशलक्ष टनापर्यंत नेण्याचा वेकोलिचा प्रयत्न आहे. रेल्वेद्वारे होणारा कोळसा पुरवठा लवकर होत नाही. परिणामी वीजनिर्मिती केंद्राच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. रस्ता वाहतुकीने मात्र कोळसा लवकर पोहोचतो. कोराडी येथे रेल्वेने कोळसा पुरवण्यात अनेक अडचणी येत आहेत. म्हणून रस्ता वाहतुकीने कोळसा पुरवठा केला जातो. आतापर्यंत रेल्वेनेच अधिकाधिक कोळसा पुरविण्यात आला. येत्या ३० जूनपर्यंत जास्तीत जास्त कोळसा महानिर्मितीच्या केंद्रांना पुरविण्याचे निर्देशही मिश्रा यांनी दिले.वेकोलिकडून रेल्वे, रस्ता वाहतूक आणि रोप वे द्वारे तिमाहीत ९५ दशलक्ष टन कोळसा पुरविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. आतापर्यंत हे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. २०१८-१९ मध्ये पहिल्या तिमाहीत ८४.२४ दशलक्ष टन, दुसऱ्या तिमाहीत ७४.८३ दशलक्ष टन, तिसऱ्या तिमाहीत ८७.५० दशलक्ष टन कोळसा पुरविण्यात आला. दक्षिण पूर्व कोल लिमिटेड, महानदी कोल लिमिटेड, दक्षिण मध्य कोल लिमिटेडच्या तुलनेत वेस्टर्न कोल फिल्डकडून अधिक कोळसा महानिर्मितीला पुरविण्यात आला आहे. आजपर्यंत खापरखेडा केंद्रात ४ दिवसांचा कोळसा साठा, कोराडी ४ दिवसांचा, नाशिकला ३ दिवसांचा, भुसावळला १८ दिवसांचा, चंद्रपूरला १२ दिवसांचा, पारसला ७ दिवसांचा तर परळीला २२ दिवसांचा कोळसा साठा उपलब्ध आहे.चंद्रपूर आणि कोराडी-खापरखेडा या विद्युत निर्मिती केंद्रांना अनुक्रमे ४५,१०० टन आणि ३३.६०० टन कोळसा दररोज लागतो. दक्षिण मध्य, महानदी, दक्षिण पूर्व कोल लिमिटेडच्या तुलनेत वेकोलिचा कोळसा स्वस्त आणि दर्जा चांगला असलेला असण्याचा दावा मिश्रा यांनी केला. जर महानिर्मितीने सर्व कोळसा वेकोलिकडूनच घेण्याचा निर्णय घेतला तर वेकोलिने कोळसा पुरविण्याची जबाबदारी घेतली. असे असले तर बाजारात ज्या कंपनीचा कोळसा स्वस्त उपलब्ध आहे, त्या कंपनीकडूनच कोळसा घेण्याचा निर्णय महानिर्मितीतर्फे घेतला जात असतो. दक्षिण मध्य कोल लिमिटेडच्या तुलनेत वेकोलिचा कोळसा स्वस्त असल्याचा दावाही मिश्रा यांनी यावेळी केला. जर वेकोलिचा कोळसा स्वस्त पडत असेल तर महाग कोळसा घेणे बंद करून वेकोलिचा कोळसा घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले.कोराडी आणि खापरखेडा या केंद्रांना वेकोलिच्या भानेगाव आणि सिंगोरी या खाणीतून पुरेसा कोळसा पुरविण्याची तयारी वेकोलिने दाखविली आहे. तसेच गोंडेगाव आणि इंदर या खाणीतही कोळसा उपलब्ध असून तेथूनही कोळसा पुरविण्याची तयारी वेकोलिची आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWestern Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूरelectricityवीज