लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन व संविधान फाऊंडेशनच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून ‘वॉक फॉर संविधान’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करून संविधान दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमी ते संविधान चौक या वॉकथॉनमध्ये शहरातील मुस्लिम बौद्ध, शीख, ख्रिश्चन, हिंदू अशा सर्व धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रीय एकता व एकात्मतेचे दर्शन घडविले. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, संविधान फाऊंडेशनच्या रेखा खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वॉकथॉन’ला प्रारंभ करण्यात आले. हजारो नागरिकांचा सहभाग असलेल्या वॉकथॉनमधील संविधानाच्या जयघोषाने अवघे नागपूर दुमदुमले. वॉकथॉन संविधान चौकात पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संविधानाचा जागर करणाऱ्या गीतांचे गायन केले. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. ‘वॉक फॉर संविधान’मध्ये शेकडो नागरिकांच्या हाती तिरंगा ध्वज होते. सर्वांच्या हाती संविधानावरील स्लोगन लिहिलेले विविध फलक लक्ष वेधून घेत होते. ‘वॉक फॉर संविधान’मध्ये विविध समाजाचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. यात पोवार समाज संघटनेचे मोतिराम चौधरी, मराठा सेवा संघाचे प्रमोद वैद्य, पंकज निंबाळकर, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे टी. बी. देवतळे (निवृत्त पोलीस अधीक्षक), शिवदास वासे, राजरतन कुंभारे, डॉ. जयराम खोब्रागडे, मिलिंद बन्सोड, संभाजी ब्रिगेडचे अमोल वाकुडकर, प्रशांत शेंडे, समीर जाधव, अभिजित दळवी, पिंटू मुनिश्वर, संविधान फाऊंडेशनचे दीपक निरंजन, नेहा खोब्रागडे, जिजाऊ ब्रिगेडच्या स्वाती शेंडे, सुनीता जिचकार, कुणबी महासंघाचे खडसे, कोहळे, विजय शेंडे, प्रा. शशिकांत डांगे, विजय बेले, शिरीष कांबळे, अल्का निरंजन, नमा खोब्रागडे, जागृत नागरिक मंचाचे रामभाऊ आंबुलकर यांच्यासह विविध सामाजिक संघघनांचे प्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते, सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. संचालन प्रा. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले तर अतुल खोब्रागडे यांनी प्रास्ताविक-भूमिका विशद केली.पोलीस बँड पथकाने वेधले लक्ष या वॉकथॉनच्या समारोपप्रसंगी संविधान चौकात पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीतासह विविध गीतांच्या धून सादर करीत लोकांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस बँडवर देशभक्तीपर गीतांची धून सादर करण्यात आली.