शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

अण्णाभाऊ साठेंच्या नातसुनेची न्यायासाठी भटकंती

By admin | Published: December 22, 2015 4:37 AM

शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे स्फुल्लिंग चेतविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पणनातीची आठ

मुलीचे अपहरण करून हत्या : पोलिसांकडून आरोपीला अभय नरेश डोंगरे ल्ल नागपूरशाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे स्फुल्लिंग चेतविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पणनातीची आठ महिन्यांपूर्वी हत्या झाली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर कारवाई केलेली नाही. वारंवार प्रयत्न करूनही पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने न्याय मिळवून घेण्यासाठी अण्णाभाऊंची नातसून गेल्या आठ महिन्यांपासून भटकंती करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, देश-विदेशात गौरवान्वित झालेल्या अण्णाभाऊशी संबंधित (पणतीचे अपहरण करून अतिप्रसंग केल्यानंतर हत्या झाल्याचे) हे प्रकरण पोलीस गंभीरपणे घ्यायला तयार नाही, ही यातील आणखी एक संतापजनक बाब आहे. अण्णाभाऊच्या नातसून लीलाबाई अशोक साठे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपुरात आल्या. प्रस्तुत प्रतिनिधीशी त्यांची भेट झाल्यानंतर या खळबळजनक प्रकरणात पोलीस प्रशासन साठे कुटुंबीयांसोबत कसे अन्यायपूर्ण वर्तन करीत आहे, त्याची कैफियत लीलाबाई यांनी मांडली. साहित्याची प्रचंड श्रीमंती मिरवणारे अण्णाभाऊंचे नातू अशोक साठे यांचे कुटुंबीय अद्यापही हलाखीतच जगत आहेत. ते त्यांच्या मूळगावी वाटेगाव (जि. सांगली) येथे राहतात. त्यांची मुलगी सुवर्णा ही ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल होती. ४ फेब्रुवारीपर्यंत कार्यरत असलेल्या सुवर्णाला सुनील इंगळे नामक आरोपीने सोबत नेले. त्यानंतर ७ फेब्रुवारीला सुवर्णा भाजल्यामुळे गंभीर अवस्थेत कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा निरोप इस्पितळातून साठे कुटुंबीयांना मिळाला. त्यामुळे लीलाबाई आणि अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. तेथे सुनील बाबूराव इंगळे तिच्याजवळ होता. १४ फेब्रुवारीला सुवर्णाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांना कसलीही सूचना न देता इंगळेने सुवर्णावर परस्पर अंत्यसंस्कार केले. सुवर्णाचे अपहरण करून अतिप्रसंगानंतर तिला जाळून मारल्याची तक्रार शोकसंतप्त साठे कुटुंबीयांनी लगेच कासेगाव पोलीस ठाण्यात केली. मात्र पोलिसांनी या गरीब कुटुंबाला न्याय न देता त्यांना टाळणे सुरू केले.एकुलत्या एक कमावत्या मुलीचा असा अंत झाल्यामुळे आणि पोलिसांकडून न्याय मिळत नसल्यामुळे मानसिक धक्का बसल्याने सुवर्णाचे वडील अशोक साठे यांचे निधन झाले. तेव्हापासून सुवर्णाची आई लीलाबाई न्यायासाठी या-त्या अधिकाऱ्याचे, लोकप्रतिनिधीचे उंबरठे झिजवीत आहेत.इंगळेकडून धमक्यासंपूर्ण कुटुंबीयांसाठी आधार ठरलेली तरुण मुलगी अशा पद्धतीने मारली गेल्यामुळे शोकसंतप्त लीलाबाई न्यायासाठी आक्रोश करीत आहे. तर ती इकडे तिकडे जात असल्यामुळे चिडलेला आरोपी इंगळे आणि त्याचे साथीदार ‘तू थांबली नाही, तर तुला आणि तुझ्या मुलांनाही तसेच जाळून मारेन’,अशी धमकी देत आहे. पोलीस मात्र आपल्या तक्रारीची का दखल घेत नाही आणि इंगळेवर कोणत्या कारणामुळे कारवाई करीत नाही, ते मला कळतच नसल्याचे लीलाबाई म्हणतात. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील महिला-मुलीसोबत असे काही घडले असते तर पोलीस प्रशासन असेच वागले असते काय, असा सवालही लीलाबाई करीत आहेत. निर्भयाच्या प्रकरणानंतर महिला-मुलींच्या अत्याचारासंदर्भातील कायदे अधिक कडक झाले. ते आमच्या सुवर्णासाठी लागू होत नाहीत काय, असा केविलवाणा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.मुख्यमंत्र्यांशी भेट कशी होणार? नागपुरात अधिवेशन सुरू आहे, येथे तरी मुख्यमंत्र्यांची भेट मिळेल, त्यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यास आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा बाळगून लीलाबाई सोमवारी नागपुरात पोहोचल्या. अत्यंत गरिबीत जगणाऱ्या लीलाबाई यांनी येथे पोहोचण्यासाठी पैशाची जमवाजमव कशी केली, ते सांगताना त्यांची अवस्था शब्दातीत होती. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव तडाखे यांच्या मदतीने त्या नागपुरात आल्या खऱ्या, मात्र मुख्यमंत्र्यांना कसे भेटावे, अशी समस्या त्यांना भेडसावत आहे. त्यासाठी त्या इकडे तिकडे फिरत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची कशी भेट घेता येईल, असा प्रश्न करीत त्या दिवसभर नागपुरात फिरत होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात (कॅम्प) जाऊन निवेदनही दिले आहे. एकदा मुख्यमंत्र्यांनी दोन मिनिट आपली व्यथा ऐकून घ्यावी, अशी त्यांची भावना आहे.