गमछूचा १४ सप्टेंबरला जुनी शुक्रवारीच्या गजानन चौकात खून करण्यात आला होता. पोलिसांनी १५ सप्टेंबरला खुनाचा सूत्रधार पीयूष ऊर्फ दद्या मालवंडे, लोकेश येडने, वैभव बांते आणि एका अल्पवयीन साथीदाराला अटक केली होती. त्यानंतर अजनी येथील रहिवासी गौरवचा शोध घेण्यात येत होता. गुरुवारी रात्री तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला न्यायालयासमोर हजर करून २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. कोतवाली पोलीस पीयूष ऊर्फ दद्या आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करीत आहेत. चौकशीत दद्या कोणतीच ठोस माहिती देत नाही. तो पहिल्या दिवसापासून गमछूने वाद घालून धमकी दिल्यामुळे त्याचा खून केल्याचे सांगत आहे. दद्या पोलिसांना गमछू आणि त्याच्यात ज्या पद्धतीने वाद झाल्याचे सांगत आहे, त्यावरून गमछूचा खून त्याने केला ही बाब पोलिसांना पटत नाही. दद्याला ओळखणारे व्यक्ती पहिल्या दिवसापासून अजनीच्या कुख्यात गुन्हेगाराच्या माध्यमातून गमछूच्या खुनाची सुपारी दिल्याचे सांगत आहेत. दद्या अजनीतील कुख्यात टोळीच्या सूत्रधाराशी निगडीत आहे. या सूत्रधाराचे साथीदार दक्षिण नागपुरातील वादग्रस्त बिल्डरशी जुळलेले आहेत. एका जमिनीवरून बिल्डरचा गमछू सोबत वाद सुरू होता. त्यामुळे बिल्डरचा त्याच्या खूनात हात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तीन दिवसांच्या तपासात पोलीस बिल्डर किंवा त्याच्याशी निगडित गुन्हेगारांबाबत माहिती मिळवू शकले नाहीत. परंतु बिल्डर आणि त्याचे साथीदार संगम टॉकीजजवळ जेथे दारू पिण्यासाठी एकत्र येत होते तेथे शुकशुकाट पसरला आहे.
.............