लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस तामील होऊनही प्रतिसाद न दिल्यामुळे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांविरुद्ध १५ हजार रुपयाचा जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला. तसेच, त्यांना २ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले.
काँग्रेस नेते उमाकांत अग्निहोत्री यांनी विदेशात जाण्याकरिता पासपोर्ट मिळावा याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांना हा दणका दिला. अग्निहोत्री यांनी पासपोर्टकरिता सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ३ सप्टेंबर २०२० रोजी तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.