मंत्रिपदाची ऑफर होती, पण गेलो नाही; देशमुख यांचा अजित पवारांवर पलटवार

By जितेंद्र ढवळे | Published: December 1, 2023 07:53 PM2023-12-01T19:53:48+5:302023-12-01T19:54:46+5:30

देशमुख म्हणाले, शरद पवार यांना सोडून कधीच सत्तेत सहभागही होणार नाही असे मी ठामपणे सांगितले होते.

Was offered a ministry but didn't go Deshmukh's counter attack on Ajit Pawar | मंत्रिपदाची ऑफर होती, पण गेलो नाही; देशमुख यांचा अजित पवारांवर पलटवार

मंत्रिपदाची ऑफर होती, पण गेलो नाही; देशमुख यांचा अजित पवारांवर पलटवार

नागपूर : तुम्हाला जे खाते पाहिजे ते देतो; पण तुम्ही आमच्यासोबत या अशी ऑफर मला होती, असा दावा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

कर्जत येथील शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. यात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होत असताना आमच्याकडून अनिल देशमुख यांचाही मंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र भाजपने देशमुखांच्या मंत्रिपदाला नकार दिला, असा दावा अजित पवार यांनी केला. यावर उत्तर देताना देशमुख म्हणाले, शरद पवार यांना सोडून कधीच सत्तेत सहभागही होणार नाही असे मी ठामपणे सांगितले होते.

अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत उपस्थित होतो. पण त्या बैठकीत चुकीचे निर्णय घेऊन शरद पवारांना त्रास देऊ नका, असे सांगत होतो. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आपल्याला अनेक फोन येत होते. पण ज्या भाजपने खोट्या आरोपाखाली मला त्रास दिला त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा प्रश्नच नव्हता. अजितदादा आज जे काही सांगत आहेत ते सांगण्यासाठी त्यांना सहा महिने का लागले? असा सवाल देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
 

Web Title: Was offered a ministry but didn't go Deshmukh's counter attack on Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.